शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मनपाची उलटतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:17 IST

पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी अधिवेशनातून वेळ काढून मनपाच्या सुमारे २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातून काय काम केले, याचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी अधिवेशनातून वेळ काढून मनपाच्या सुमारे २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातून काय काम केले, याचा आढावा घेतला. रविवारी पालकमंत्री अचानक तुळजापूरहून औरंगाबादमार्गे मुंबईला रवाना झाले. सुभेदारी विश्रामगृहात एका तातडीच्या बैठकीत त्यांनी पालिकेची उलटतपासणी केली. आठवड्यात डीपीसीतून दिलेल्या निधीतून काय कामे केली, याचा अहवाल देण्याचे आदेश त्यांनी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना दिले. पालिकेला एवढ्या प्रमाणात निधी देऊनही कामे होत नसतील तर माझा नाईलाज आहे. दोन वर्षांपासून कुठलेही काम गतीने पूर्ण केलेले नाही. मनपातील अधिकारी काम करीत नसल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केला.एकेक प्रस्ताव पुढे येण्यासाठी वर्ष लावले जात असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम दुसºया टप्प्याचे काम रेंगाळले आहे. विमानतळासमोर लेण्यांचे म्युरल्स लावण्याचे काम केले नाही. चिकलठाणा येथील २०० बेडस्च्या हॉस्पिटलला पाणीपुरवठा करण्याचे काम झाले नाही. सफारी पार्कसाठी जागा मनपाच्या ताब्यात दिली. परंतु पुढे काहीही केले नाही. १५० हेक्टर जागा नव्याने प्रस्तावित केली. ५० खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचे काम कुठंपर्यंत आले आहे. जिल्हा नियोजन समितीने अनुदान दिले, परंतु कामाचे काय झाले, असा सवाल पालकमंत्र्यांनी केला.शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाचे घोडे पुढे का सरकत नाही. संत एकनाथ रंगमंदिरासाठी समिती गठीत करणे, तसेच मुंबईतील कालिदास नाट्यगृहाप्रमाणे ते सुशोभित करण्याबाबतचा प्रस्ताव का दिला नाही. २ कोटी रुपये मार्चपर्यंत खर्च करून २ कोटी एप्रिलमध्ये देण्याचे सांगितले तरी मनपा काम करीत नाही, यावरून त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना खडसावले.जांभूळवनामध्ये केलेल्या वृक्षारोपणाचे काय झाले. कटकटगेटमधील किती रस्त्यांचे डांबरीकरण करणे बाकी आहे. डीपीसीतून निधी दिलेल्या हॉस्पिटल्सची कामे का झाली नाहीत. शासकीय दूध डेअरीची जागा हॉस्पिटल्ससाठी आजवर ताब्यात का आली नाही. १०० कोटींच्या रस्त्यांच्या निधीचे काय नियोजन केले. मनपाची करवसुली किती झाली.पर्यटनस्थळ विकासाचे काय झाले. कटकटगेट हॉस्पिटलला १ कोटी दिले, त्याचे काय केले, अशा अनेक कामांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, गजानन मनगटे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.‘समांतर’ बाबत तडजोड नकोमनपाचे मुख्यालय व इतर मालमत्ता गहाण ठेवण्याबाबत कुणाचे डोके चालते आहे. जनाची नाहीतर मनाची ठेवा, असा टोला लगावत सगळ्या प्रकरणांचा खुलासा देण्याचे आदेश कदम यांनी अभियंत्यांना दिले. समांतरच्या कामाला तीव्र विरोध असल्याचे सांगून कदम म्हणाले, निलंबित केलेले अभियंते कोणत्या मुद्यावर परत घेतले, याचा खुलासा करा. भविष्यात समांतर जलवाहिनीच्या योजनेबाबत मनपाची भूमिका काय आहे. १० टक्के वाढीव वसुलीमुळे जनतेचे नुकसान होणार आहे. कार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, कंपनी कोर्टाबाहेर वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नात आहे. समांतरबाबत काहीही तडजोड करू नका, असे कदम यांनी मनपाला सांगितले.