बीड: येथील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे कार्ड बदलून सुरक्षारक्षकानेच सव्वा लाखांना चुना लावला़ याप्रकरणी शहर ठाण्यात गुरुवारी तिघांविरुद्ध फिर्याद नोंदविण्यात आली़बीड येथील पूरग्रस्त कॉलनीतील रहिवाशी शंकर शाहूराव गालफाडे हे गेल्या काही दिवसांपूर्वी जालना रोडवरील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत गेले होते़ यावेळी त्यांना पैसे काढता येत नसल्याने त्यांनी एटीएम कार्ड सुरक्षारक्षक गणेश नामदेव यलमकर (रा़ बीड) यांच्या हाती सोपविले़ त्यांनी कार्ड बदलून औरंगाबाद, जयपूर येथे १ लाख १८ हजार रुपये काढून घेतले़ इकडे गालफाडे हे मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणाची फीस भरण्यासाठी पुन्हा एकदा एटीएममध्ये गेले़ तेव्हा खात्यातून रक्कम गायब असल्याचे त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले़ त्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली़ शंकर गालफाडे यांच्या फिर्यादीवरुन सुरक्षारक्षक यलमकर व इतर दोन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
सुरक्षा रक्षकासह दोघांवर गुन्हा
By admin | Updated: June 28, 2014 01:15 IST