शकुंतला अंकुश दहातोंडे (३१) या विवाहितेने रविवारी दुपारी गट नं. १८ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. संशयित आरोपी शिवाजी दहातोंडे, शोभा दहातोंडे, योगेश दहातोंडे, धनश्री दहातोंडे, आबासाहेब दहातोंडे व लता दहातोंडे यांनी संगनमत करून शेतीच्या सामाईक बांधाच्या कारणावरून शिवीगाळ करून तुझ्या नवऱ्याला संपवून टाकू अशा धमक्या देऊन मयतास मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मयतेचा पती अंकुश दहातोंडे याने दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने करीत आहेत. संशयित आरोपी शिवाजी दहातोंडे व योगेश दहातोंडे यांना अटक करण्यात आली आहे.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:07 IST