शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

वादग्रस्त सानप प्रभारी शिक्षणाधिकारी

By admin | Updated: January 22, 2015 00:44 IST

बीड : शिक्षणाधिकारी प्राथमिक पदाचा प्रभारी ‘चार्ज’ बुधवारी अखेर निरंतरचे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्याकडे देण्यात आला़ शिक्षणाधिकारी पदी कोणाला बसवायचे?

बीड : शिक्षणाधिकारी प्राथमिक पदाचा प्रभारी ‘चार्ज’ बुधवारी अखेर निरंतरचे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्याकडे देण्यात आला़ शिक्षणाधिकारी पदी कोणाला बसवायचे? यावरून पदाधिकाऱ्यांमध्येही राजकीय नाट्य रंगले़ मात्र, त्यात वादग्रस्त सानप यांच्याच नावापुढे शिक्कामोर्तब झाले़सुखदेव सानप हे यापूर्वी शिक्षणाधिकारी प्रा़ म्हणून कार्यरत होते़ २०१३ मध्ये त्यांच्या काळात बदल्या, पदोन्नत्यांची अनेक प्रकरणे बाहेर आली़ यावेळी शिक्षक संघटनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा भडीमार केला होता़ त्यानंतर सानप यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला़ या तक्रारीमुळेच सानप यांची निरंतरचे शिक्षणाधिकारी म्हणून बीडमध्ये बदली झाली होती़ मात्र शिक्षणाधिकारी प्रा़ ही क्रीम पोस्ट सोडून निरंतरचे शिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेण्यास सानप धजावले नाहीत़ त्यांनी दीर्घ रजा टाकून घरी बसणे पसंत केले़ तब्बल सहा महिन्यानंतर त्यांनी निरंतरचा चार्ज घेतला़ दरम्यानच्या काळात बीडला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले नाहीत़ निवृत्तीजवळ आलेल्या अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून संधी मिळत गेली़ दोन महिन्यांपूर्वी शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाईचे प्रा़ कलीमोद्दीन शेख यांना प्रभारी पदभार देण्यात आला़ मात्र, अवघ्या चार दिवसातच त्यांनी हा चार्ज सोडला़ त्यानंतर सहायक संचालक बी़ ए़ तुपे यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता़ मात्र, त्यांनीही वैद्यकीय रजा घेतली़ त्यामुळे कामांचा खोळंबा होऊ लागला़ शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वर्ग एक दर्जाचे अधिव्याख्याता विक्रम सारूक हे या पदासाठी दावेदार होते़नव्यानेच आलेले उपशिक्षणाधिकारी एस़ पी़ जैस्वाल यांनीही चार्ज घेण्यासाठी ‘फिल्डींग’ लावल्याची चर्चा होती़ काही पदाधिकाऱ्यांनी सारूक यांच्यासाठी शिफारशीही केल्या मात्र, त्यानंतर राजकीय नाट्य रंगले़शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सुखदेव सानप यांना दिल्याचा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने निषेध नोंदविला़ अनियमिततेचा ठपका असलेल्या सानपांना चार्ज देऊ नका, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ दिगांबर गंगाधरे यांनी केली़ (प्रतिनिधी)सुखदेव सानप यांच्या काळात पदोन्नत्या, बदल्यांमध्ये अनेक घोटाळे झाले़४जि़ प़ पदाधिकाऱ्यांनी त्यांना दोन वेळा सक्तीच्या रजेवर पाठवले होते़४स्वत: कार्यालयात कमी बसत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण नाही़४तत्कालीन उपसंचालक सुखदेव डेरे यांनी अकार्यक्षम अधिकारी असल्याचा ठपका ठेवला होता़ मागे काय झाले याच्यापेक्षा आताची गरज ओळखून सानप यांना चार्ज दिलेला आहे, असे जि़ प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले़ त्यांच्यावर आमचे नियंत्रण राहील़ पूर्णवेळ अधिकारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ प्रधान सचिवांकडे विविध विषयांसंदर्भात बैठक लावली आहे, असेही त्यांनी सांगितले़गटनेते मदनराव चव्हाण यांनी सत्ताधारी घोटाळेबाज अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला़ सीईओंनी सानप यांच्याकडे चार्ज देताना विचार करायला हवा होता, असेही ते म्हणाले़