संतोष मगर , तामलवाडीजनावरांना खाण्यालायक नसणाऱ्या सूर्या गवतापासून बाष्पीभवनाद्वारे तेलाची निर्मिती करण्याचा व्यवसाय तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारात ३३ वर्षापासून सुरू आहे. हे तेल मुंबई येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. या तेलास प्रति किलो सतराशे ते अठराशे रुपये दर मिळतो. याचा वापर हा सुगंधी वस्तू तयार करण्यासाठी केला जातो, असे व्यवसायिक शेख अब्दुल अजीज यांनी सांगितले.मुळचे उस्मानाबाद शहरातील रहिवाशी शेख अब्दुल अजीज यांचे वडील शेख अब्दुज माजीद हे तेल निर्मितीचा व्यवसाय करीत. परंतु, तेलाला निर्यात बंदी आली व भावाची घसरण झाली. अब्दुल अजीत यांनी ३३ वर्षापूर्वी सांगवी (काटी) शिवारात गावालगत ओढ्याकाठी भट्टी सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. लोखंडी हांड्यात १०० ते १२५ पेंड्या गवत भरुन त्याचे पाईपद्वारे वाफ पाण्यात ठेवलेल्या घागरीत जमा व्हावी अशा बेताने नियोजन करुन २ ते ३ तास त्या गवतास हांड्यात शिजवून घेतात. एका भट्टीत ३०० मिमी तेल व १०० मिली मड्डी एवढा तेल मिश्रित माल मिळतो. दिवसाकाठी ३ भट्ट्या होतात. त्यातून १ हजार ते १२०० मिली तेल मिळते. हे तेल बाजारात १७०० ते १८०० रुपये किलो दराने विकले जाते. त्यासाठी शेख अब्दुल अजीज यांना मुंबई गाठावी लागते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मजुरी व मजुराची बचत करत शेख अजीज यांचा मुलगा अतीज हाही या व्यवसायात वडिलांना मदत करतो. त्यामुळे रोजगाराची बचत झाली. १५ किलो तेलाची साठवण झाल्यानंतर ते विक्रीस घेवून जातो, असे अजीज शेख यांनी सांगितले.महिलांकडून असाही उपयोगपौष महिन्यात दर रविवारी अनेक सुवासिनी सूर्य नारायणाची पूजाअर्चा करतात. या पुजेवेळी सुवासिनी महिला सूर्या गवताच्या काड्यांना कापसाचे बोळे तयार करून ते गोडेतेलात बुडवून अग्निने पाजळतात. यामुळे सूर्याची पूजा रुजू होते, अशी धारणा आहे. त्यामुळे पूजा विधीतही याचा वापर होतो.
सांगवी काटी गावात सूर्या गवतापासून तेल निर्मिती..!
By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST