शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन नगराध्यक्ष

By admin | Updated: July 18, 2014 01:49 IST

उस्मानाबाद : जिल्हाभरातील आठही नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी गुरूवारी निवड प्रक्रिया घेण्यात आली.

उस्मानाबाद : जिल्हाभरातील आठही नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी गुरूवारी निवड प्रक्रिया घेण्यात आली. सर्वांचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद पालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील काकडे यांची वर्णी लागली. तर भूम पालिकेचे नगराध्यक्षपदही राष्ट्रवादीच्याच संयोगिता गाढवे यांच्याकडे आले. या दोन पालिका वगळता अन्य पालिकांतील नगराध्यक्षांच्या निवडी बिनविरोध झाल्या.तुळजापूर येथे राकाँच्या जयश्री कंदले, कळंबमध्ये काँग्रेसच्या मिरा चोंदे, नळदुर्गमध्ये काँग्रेसच्या मंगलताई सुरवसे, मुरूममध्ये काँग्रेसचे धनराज मंगरूळे, परंड्यात सेनेच्या राजश्री शिंदे आणि उमरग्यात महायुतीच्या केवळबाई औरादे यांची वर्णी लागली आहे. एकूण पालिकांचा विचार केला असता राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी तीन तर शिवेसेना-महायुतीच्या हाती दोन पालिकेच्या सत्तेच्या चाव्या आल्या आहेत.सुनील काकडे यांची बाजीउस्मानाबाद : नगरद परिषद नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील काकडे यांनी काँग्रेसचे उमेदवार नादेरउल्लाह हुसैनी यांचा दणणीत पराभव केला. काकडे यांना राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व २३ तर हुसैनी यांना केवळ सात मतांवर समाधान मानावे लागले. ही मतदान प्रक्रिया पालिकेच्या सभागृहामध्ये गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पार पडली.उस्मानाबाद नगर परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकहाती सत्ता आहे. त्यांचे २३ इतके संख्याबळ आहे. तर दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेले काँग्रेस आणि सेना-भाजपाकडे प्रत्येकी पाच या प्रमाणे दहा इतकी सदस्य संख्या आहे. नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्याने इच्छुकांची संख्या जास्त होती. परंतु, माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेतल्यानंतर सुनील काकडे यांच्या नावावर एकमत झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीकडून काकडे यांनी अर्ज दाखल केला होता. तसेच पाच सदस्य संख्या असलेल्या काँग्रेस पक्षाचे नादेरूल्लाह हुसैनी यांनीही आखाड्यात उडी घेतली होती. तसेच शिवसेनेच्या प्रेमाताई पाटील यांनीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, १६ जुलै रोजी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील काकडे आणि काँग्रेसचे नादेरूल्लाह हुसैनी यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, निवडणुकीमध्ये कुठल्याही स्वरूपाचा दगाफटका होवू नये, म्हणून सहलीवर गेलेले राष्ट्रवादीचे सदस्य गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उस्मानाबादेत दाखल झाल्यानंतर थेट पालिकेत आले. त्यानंतर काँग्रेस, सेना-भाजपाचे सदस्यही आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या २३ सदस्यांनी हात उंचावून सुनील काकडे यांच्या पारड्यात मते टाकली. तर हुसैनी यांना केवळ सात मतांवर समाधान मानावे लागले. त्यांना शिवसेना-भाजपाची पाच तर काँगे्रसची दोन मते मिळाली. विशेष म्हणजे काँग्र्रेसच्या तीन महिला सदस्या मतदानावेळी गैरहजर राहिल्या. यामध्ये जेलीसबी शमशाद अहेमद सय्यद, बुद्द्रुन्ननिसा हमशोद्दीन शेख, ज्योती जगदाळे यांचा समावेश आहे. त्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी काकडे यांची निवड जाहीर केली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नंदूराजे निंबाळकर, नगरसेवक अमित शिंदे, प्रदिप मुंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)राष्ट्रवादीची एकजूट अभेद्यकाँग्रेस आणि शिवसेना-भाजप एकत्र येवून खेळी करू शकते, असे तर्क-वितर्क अर्ज दाखल केल्यापासूनच वर्तविले जात होते. सोयीनुसार गणितेही जुळविली जात होती. ही बाब लक्षात घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्ष मतदानावेळी राष्ट्रवादीचे एकही मत न फुटल्याने हे सर्व तर्क-वितर्क फोल ठरल्याचे दिसून आले. तुळजापुरात कंदले यांची वर्णीतुळजापूर : येथील नगर परिषदेचय अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री विजय कंदले यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर राकाँ कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच गुलाल उधळून व पेढे वाटून आनंद साजरा केला. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कंदले यांची विजयी मिरवणूक काढून श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले.पीठासीन अधिकारी बी. एस. घुगे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या २४ पैकी १७ नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी जयश्री कंदले यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने घुगे यांनी दुपारी कंदले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी मुख्याधिकारी राजीव बुबणे, गटनेते नारायण गवळी, उपाध्यक्ष गणेश कदम, नगरसेवक बाळासाहेब शिंदे, पंडितराव जगदाळे, अजीत परमेश्वर, दिलीप गंगणे, विनोद गंगणे, विजय कंदले, सज्जनराव साळुंके, आनंद कंदले, भारत रोकडे, फुलचंद व्यवहारे, विजय गंगणे, राजाभाऊ भोसले, महेश चोपदार आदी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पालिकेतील कर्मचारी संपावर असल्याने कामकाज ठप्प आहे. याच अनुषंगाने गुरूवारी नूतन नगराध्यक्षा कंदले यांनी पदभार स्वीकारताच संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करू. परंतु, भाविक व नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी संप मागे घ्या, अशी विनंती केली. (वार्ताहर)पुन्हा विद्यमान अध्यक्षांना संधीपरंडा : येथील नगर परिषदेत झालेल्या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्षा राजश्री शिंदे यांनाच पुन्हा अडीचवर्षे संधी देण्यात आली आहे. या पदासाठी त्यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याचे गुरुवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा करमरकर यांनी शिंदे यांची बिनविरोध निवड घोषीत केली. गुरुवारी सकाळी ११ वाजता पालिक सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी राजश्री शिंदे यांचाच एकमेव अर्ज असल्याने अवघ्या पाच मिनिटात निवडणूक निर्णय अधिकारी करमरकर यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, जि. प. गटनेते दत्ता साळुंके, उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, संजयकुमार बनसोडे, यांच्यासह नगरसेविका जैतूनबी पठाण, परविन बासले, आदिका पालके, वनिता ऐतवाडे, मिरा कदम, लता मेहेर, इस्माईल कुरेशी, हारुणखाँ पठाण, शिवाजी मेहेर, मुकूल देशमुख, सुभाष शिंदे, बाळू माळी, मैनुद्दीन तुटके, सुबोधसिंह ठाकूर, शंकर इतापे, माऊली गोडगे, अ‍ॅड. जहीर चौधरी, मन्नान बासले, सतीश मेहेर, कृष्णा ऐतवाडे, दिलीप रणभोर, अनिल शिंदे, ज्योतीराम शिंदे, गौसखाँ पठाण, दीपक थोरबोले, जावेद पठाण, अनंत राशीनकर आदी उपस्थित होते. या बैठकीस सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार स्वरुप कंकाळही उपस्थित होते. दरम्यान या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जाकीर सौदागर व नगरसेविका सविता राशीनकर या गैरहजर होत्या. (वार्ताहर)नळदुर्ग पालिकेत सुरवसे बिनविरोधनळदुर्ग : येथील नगर परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या मंगलताई सुरवसे यांची गुरुवारी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दुसऱ्या अडीच वर्षाच्या कार्यकालात येथील नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित आहे. काँग्रेस पक्षाकडे या पदासाठी नितीन कासार, मंगल सुरवसे व मुनवर सुलताना कुरेशी हे तीन उमेदवार होते. दरम्यान, पहिल्या अडीच वर्षात हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतानाही काँग्रेसने इतर मागासवर्गीय उमेदवार नितीन कासार यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घातली होती. यानंतर अडीच वर्षाच्या काळात शब्बीर सावकार व शहबाज काझी यांनाही हे पद भूषविण्याची संधी दिली होती. १७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुफिया कुरेशी यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र १६ रोजी त्यांनी माघार घेतल्याने सुरवसे यांची निवड निश्चित झाली होती. गुरूवारी निवडणूक निर्णय अधिकारी ए. एल. काटकर व सहाय्यक नायब म्हणून असलेले नायब तहसीलदार एल. एफ. धोपीकर यांनी सुरवसे यांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी उपनगराध्यक्ष अपर्णा बेडगे, शहबाज काजी, शब्बीर सावकार, नितीन कासार, मुनवर सुलताना कुरेी, सुफिया पुराणिक, कुशावती शिरगुरे, सुमन जाधव, नय्यर जहागीरदार, निर्मला गायकवाड, कमलाकर चव्हाण यांची उपस्थिती होती. तर राकाँचे दयानंद बनसोडे, सुफिया कुरेशी, काँग्रेसच्या लक्ष्मी खारवे व अपक्ष संजय बताले हे गैरहजर होते. संपावरील कर्मचाऱ्यांनीही निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला. (वार्ताहर)कळंबमध्ये चोंदेकळंब : येथील नगर परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीराताई भागवत चोंदे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी ११ जुलै रोजी काँग्रेसच्या मीरा चोंदे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. गुरुवारी कळंब नगर परिषद कार्यालयात उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी मीराताई चोंदे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे बारवकर यांनी जाहीर केले. या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, तसेच नगरसेवक, विविध पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी चोंदे यांचा सत्कार केला. निवडीनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)उमरग्यात महायुतीच्या औरादेउमरगा : येथील नगर परिषदेच्या अध्यषपदी शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीच्या केवळबाई दत्तात्रय औरादे यांची बिनविरोध निवड झाली.येथील प्रभाग एकमधून औरादे यांनी नगरसेवकाची निवडणूक जिंकली होती. माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे महायुतीच्या वतीने औरादे यांची निवड करण्यात आली. आ. ज्ञानराज चाग्ौुले, बसवराज शहापुरे, रज्जाक अत्तार, धनंजय मुसांडे, सिद्रामप्पा चिंचोळे, आकाश शिंदे, बालाजी सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, राजश्री कोथळीकर, सविता वाघमारे, मंगलबाई राठोड, सुप्रिया माशाळकर, बळीराम पवार, प्रेमला टोपगे आदींची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाच्या राजश्री कोथळीकर, सेनेच्या सुनीता सगर व काँग्रेसच्या प्रेमलता टोपगे यांनीही अर्ज दाखल केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रवींद्र गुरव यांनी केवळबाई औरादे यांची निवड बिनविरोध जाहीर केली. (वार्ताहर)धनराज मंगरूळेंची निवडमुरूम : येथे पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष धनराज मंगरूळे यांना पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. पालिकेत एकूण सतरा नगरसेवक असून, यापैकी १५ काँग्रेसचे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येक एक नगरसेवक आहे. त्यामुळे पालिकेवर काँग्रेसचीच एकहाती सत्ता आहे. गुरूवार पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत माजी उपनगराध्यक्ष धनराज मंगरूळे यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रभोदय मुळे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी मावळते नगाराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे, उपनगराध्यक्षा मंगल नारायणकर, राजू मिणियार, उल्हास घुरघुरे, काकासाहेब पाटल, उमेश कारभारी, सिद्राम बालकुंदे, प्रमोद कुलकर्णी, शंभुलिंग पाटील, मुन्ना मुंदडा, सुधीर चव्हाण, रूपचंद गायकवाड, पद्मीनबाई अंबर, बबन बनसोडे, गोविंद पाटील, श्रध्दा पांचाळ, महरूद्र चवळे, लक्ष्मण कुंभार, सुशील कांबळे, व्यंकट जाधव, राजू भोसगे आदी उपस्थित होते. निवडीच्या घोषणेनंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनीही मंगरूळे यांचा सत्कार केला. यानंतर मंगरूळे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.