शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

कृउबा समितीवर काँग्रेसचा झेंडा

By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST

औरंगाबाद : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर

औरंगाबाद : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर बुधवारी (दि.५ आॅगस्ट ) काँग्रेसचा झेंडा फडकला, पण त्यासाठी नशिबाचा हातभार घ्यावा लागला. समसमान मते पडल्याने चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. सभापतीपदासाठी नशिबाचा कौल काँग्रेसचे संजय औताडे यांना मिळाला. भाजपचे भागचंद ठोंबरे यांना उपसभापतीपदाची लॉटरी लागली. या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात माजी आमदार कल्याण काळे यांच्या रुपाने काँग्रेसने आपली स्थिती मजबूत केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याण काळे यांनी शेतकरी सहकारी विकास पॅनल तर हरिभाऊ बागडे यांनी सहकारी संस्था विकास पॅनल उभे केले होते. काळे यांच्या पॅनलचे ७ संचालक तर बागडे यांच्या पॅनलचे ६ संचालक निवडून आले होते. दोन्ही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे सभापती आपल्याच पॅनलचा बनावा व बाजार समितीवर आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी बागडे व काळे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपचे निवडून आलेले दोन बंडखोर उमेदवार संजय औताडे व विकास दांडगे कोणाला मत देतात. दोन व्यापारी संचालक काय भूमिका घेतात व हमाल-मापाडीचा एक संचालक कोणाच्या बाजूने उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोणीच आपले पत्ते खोलण्यास तयार नव्हते. बुधवारी सकाळी ११ वाजता जाधववाडीतील कृउबाच्या बैठक हॉलमध्ये सभापतीच्या निवडणुकीला सुरुवात झाली. अपक्ष उमेदवार संजय भाजपचे नेते विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सहकारी संस्था विकास पॅनल व काँगे्रसचे माजी आमदार कल्याण काळे यांच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलला सभापतीपद व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत १८ पैकी ९-९ असे समान मते मिळाली. ४यामुळे लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. चार वर्षे वयाच्या कर्तव्य विटोरे या मुलीच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या.