शहरं
Join us  
Trending Stories
1
"जब-जब जुल्म, तब-तब जिहाद", महमूद मदानी यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप म्हणाला 'व्हाईट कॉलर दहशतवाद'; काँग्रेसचीही प्रतिक्रिया
2
डोनाल्ड ट्रम्प यांची 5000 KM दूर असलेल्या देशावर हल्ल्याची तयारी, केव्हाही होऊ शकतो हल्ला? एअरस्पेस बंदची घोषणा
3
लग्नात काही जण मुलींसमोर अश्लील भाषेत बोलत होते; विरोध केला म्हणून नॅशनल प्लेयरची बेदम मारहाण करत हत्या
4
"शिवसेना को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन है"; बदलापूरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार 
5
भूक लागली, जेवण वाढ; 'हाताने घेऊन खा' म्हणताच कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या
6
Video : काळ्या समुद्रात दोन रशियन 'शॅडो फ्लीट' टँकरवर मोठा ड्रोन हल्ला, क्रू मेंबर्सची आरडाओरड; 'या' देशानं घेतली जबाबदारी
7
"मी कन्व्हर्टेड मुस्लीम.. " कंट्रोल रूमला कॉल करून अमरावती पोलिस आयुक्तालयात दिल्लीसारख्या बाॅम्बस्फोटाची धमकी
8
विराटने कसोटी निवृत्ती मागे घेण्याची होतेय मागणी; ...तर ठरेल '21व्या शतकातील' सर्वात मोठा कमबॅक!
9
Travel : काश्मीर ट्रीपच्या बजेटमध्ये आरामात फिरू शकता 'हा' देश; ५ दिवसांत मनसोक्त करता येईल भटकंती!
10
पाकिस्तानला थेट इशारा देत तालिबानने 'स्पेशल फोर्स' केली तयार;  सीमेवरील परिस्थिती चिघळणार?
11
आता 'या' देशात सोशल मीडियावर बंदी येणार? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!
12
Video - लग्नात चिप्स, स्नॅक्सवर तुटून पडले पाहुणे; चेंगराचेंगरीत चिमुकलीवर सांडला उकळता चहा
13
पाकिस्तानातील घटनादुरुस्तीने 'हुकूमशहा' बनला आसिम मुनीर! सत्ता अनियंत्रित, UN ने दिला स्पष्ट इशारा
14
"या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही..."; भर पत्रकार परिषदेत कर्णधार KL राहुल झाला निरुत्तर
15
Video : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ६२व्या वर्षी बांधली दुसरी लग्नगाठ; जोडी हेडन बनल्या 'फर्स्ट लेडी'!
16
दूध, बटर, ज्यूस... 'या' गोष्टी फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवण्याची करू नका चूक, नाहीतर होईल नुकसान
17
बाबो! ना पडला, ना लागलं... AI ने जखम दाखवून कर्मचाऱ्याने घेतली सुटी, HR ला काढलं वेड्यात
18
टाटा सिएराचे सर्वात मोठे 'प्रतिस्पर्धक', किती आहे क्रेटा आन् सेल्टॉसची किंमत? कोणती कार सर्वात दमदार? जाणून घ्या 
19
टेक्नॉलॉजिया! कपड्यांप्रमाणे आता माणसांचीही 'धुलाई' होणार; 'या' देशाने आणली जगातली पहिली 'ह्युमन वॉशिंग मशीन' 
20
IND vs SA: रोहितसोबत ओपनर कोण? किपिंग कोण करणार? कर्णधार केएल राहुलने सगळ्यांची उत्तरं दिली
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स, लोकमत सखीमंचच्या विविध मनोरंजक स्पर्धा

By admin | Updated: March 4, 2016 00:07 IST

नांदेड : कलर्स चॅनल व लोकमत सखीमंच प्रेम हा विषय घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन येत आहे़ आतापर्यंत कलर्स व लोकमत सखीमंचच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची पसंती व भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे़

नांदेड : नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कलर्स चॅनल व लोकमत सखीमंच प्रेम हा विषय घेऊन अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन येत आहे़ आतापर्यंत कलर्स व लोकमत सखीमंचच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची पसंती व भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे़ याच श्रृंखलेत पुन्हा एकदा पती-पत्नींच्या नात्यातल्या प्रेमाच्या बंधनांना स्पर्धांमधून सर्वांसमोर आणणारा एक नितांत सुंदर कार्यक्रम म्हणजे- जोडी जन्मोजन्मांची कसम प्रेमाची़ या अंतर्गत ३ स्पर्धा आणि तीन्ही स्पर्धांच्या विजेत्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे़ यात पहिली स्पर्धा म्हणजे बेस्ट जोडी (गीत)़ अतूट गायक जोडी- यामध्ये पती-पत्नी मिळून गाणे सादर करावयाचे आहे़ पण गाणे पुनर्जन्मावर आधारित कोणत्याही चित्रपटाचे असायला हवे़ दुसरी स्पर्धा म्हणजे बेस्ट जोडी (अभिनय)़ अतूट अभिनय जोडी- यात सुद्धा कोणत्याही पुनर्जन्मावर आधारित कुठल्याही चित्रपटाचे डायलॉग किंवा सीन पती-पत्नी मिळून सादर करायचा आहे़ तिसरी स्पर्धा- बेस्ट जोडी (कविता़)़ अतूट प्रेम जोडी- यात पुनर्जन्मावर आधारित स्वरचित कविता दोघांनी मिळून सादर करायची आहे़ प्रत्येक स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या १० जोड्यांना प्रवेश दिला जाईल़ यापेक्षा जास्त असल्यास प्राथमिक फेरीद्वारे अंतिम स्पर्धक निवडले जातील़ अतिशय सुंदर विषय या निमित्ताने पती-पत्नींसाठी हाताळले जाणार असून दोघांना आपल्या प्रेमाची आपल्या नात्याची परीक्षा या स्पर्धांमधून द्यायची आहे आणि पुरस्कार देखील जिंकायचे आहेत़या व्यतिरिक्त उपस्थित प्रेक्षकांसाठी बॉलिवूड जोडी ही मनोरंजक स्पर्धा ठेवली आहे़ यात सिनेजगतातील जोडी बनून यायचे आहे, तसे गेटअप करायचे आहे व वेशभूषा करायची आहे़ यात पती-पत्नी असणे आवश्यक नाही़ यात दोन सखी किंवा बहिण-भाऊ किंवा पती-पत्नी असे भाग घेऊ शकतात़ बेस्ट बॉलिवुड जोडी म्हणून विजेत्यांना पुरस्कार दिले जातील़कलर्स चॅनलने नेहमीच अशा सुंदर विषयांवर मालिकांचे प्रसारण करून स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करून तो कायम राखण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहे़ याच प्रयत्नात आणखी एक निस्सिम प्रेमावर आधारित कसम नावाची मालिका ७ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे़ एका मुलीचा आपल्या प्रेमावर इतका प्रचंड विश्वास असतो की तो मिळविण्यासाठी दुसरा जन्म घेऊन त्या प्रेमाला मिळविण्यात ती यशस्वी होते़ कसम ही सिरियल रिषी आणि तनुश्री या दोन प्रेम करणाऱ्या तरूण-तरुणीवर आधारित असून त्याच्या प्रेमाच्या वाटेत प्रेम विरह आणि प्रेम अशा प्रवासाची सुंदर मांडणी करून प्रेम हेच जगण्याची आणि जगविण्याची खरी ताकत आहे असे सांगितले आहे़अशा प्रेमाच्या कसम या सिरियलसोबत वरील स्पर्धा आणि त्यातील विजेत्या स्पर्धकांना विशेष पुरस्कार एकूणच जोडी जन्मोजन्माची कसम प्रेमाची हा कलर्स व लोकमत सखी मंचचा कार्यक्रम प्रेमाच्या वेगळ्या जगात नेण्याची किमया करेल यात शंका नाही़ कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लोकमत कार्यालयात येवून नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे़ कार्यक्रम बुधवार, दि़ ९ मार्च २०१६ रोजी होणार असून अधिक माहितीकरिता संपर्क : ९०४९२७५१५१़ (प्रतिनिधी)दोन सखी किंवा बहिण-भाऊ किंवा पती-पत्नी असे भाग घेऊ शकतात़