लातूर : लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यायवत करण्यासाठी प्रगणक म्हणून तहसीलदारांकडून आदेश देण्यात आले आहेत़ हे काम ४५ दिवस चालणारे आहे़ या कामातून तालुक्यातील कृषी अधीक्षक व कृषी पर्यवेक्षक यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना या कामातून कार्यमुक्त करण्याची विनंती केली़ परंतु तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही़ कृषी सहाय्यकांना रबी हंगामातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप, निविष्ठा वाटप, प्रकल्प राबविणे, परमिट देणे, पीक कापनी प्रयोग, मनरेगा अंतर्गत शेततळ्याचे अंदाजपत्रक बनविणे, जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्याची जबाबदारी दिलेली आहे़ तसेच निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या पूनर्रक्षण कार्यक्रमात नवीन मतदार नोंदणी, नोंदी वगळणे, दुरुस्ती करणे तसेच रविवारी विशेष मोहीम कार्यक्रम, आदी कामे बीएलओ मार्फत चालू असताना देखील राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याचे काम कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकावर लादले जात आहे़ त्यामुळे याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांचे मार्गदर्शन लाभावे, कृषी सहसंचालक लातूर यांच्या मार्फत प्रशिक्षणाचे पत्र आले तरी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे कार्यमुक्त आदेश असल्याशिवाय कृषी सहाय्यक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षणास हजर राहता येत नाही़ जनगननेचे काम ४५ दिवस पूर्ण असतानाही कार्यमुक्त करण्यासंदर्भात लेखी मार्गदर्शन करावेत, तालुका कृषी अधिकारी तोंडी आदेशाने जनगननेचे काम करा, कृषी विभागाचे काम करु नका असे सांगत आहेत़ याचे लेखी स्वरुपात आदेश सुचित करावेत़ न्यायालयाच्या आदेशाने अस्थापनेच्या १२़५ टक्के कर्मचारी अकृषी कामांकरीता अधिग्रहीत करता येतील, असा आदेश असताना देखील १०० टक्के कृषी सहाय्यकांना नेमणुका देणे योग्य आहे का, याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून कुठलाही पाठपुरावा झालेला नाही़ (प्रतिनिधी)
कृषी अधीक्षकांना घेराव
By admin | Updated: October 27, 2015 00:25 IST