शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

वाङ्मयीन संस्कृती व आधुनिकतेची सांगड घालू

By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद नवलेखकांची गुणवत्ता हेरून त्यांना संधी देणे, विस्मृतीत गेलेल्या जुन्या अभिजात पुस्तकांच्या आवृत्त्या काढणे व पुनर्प्रकाशित करणे, बालसुलभ भावना जपणारी बालसाहित्य निर्मिती,

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादनवलेखकांची गुणवत्ता हेरून त्यांना संधी देणे, विस्मृतीत गेलेल्या जुन्या अभिजात पुस्तकांच्या आवृत्त्या काढणे व पुनर्प्रकाशित करणे, बालसुलभ भावना जपणारी बालसाहित्य निर्मिती, नवसाक्षरांसाठी मासिक चालविणे, हे सर्व करीत असताना वाङ्मयीन सभ्यता जपत वेगवेगळे लक्षवेधी व यशस्वी प्रयोग करणारे महाराष्ट्रात सुपरिचित असलेल्या साकेत प्रकाशनाचे संस्थापक, केंद्र व राज्य सरकारच्या विविध पुरस्कारांसह अनेक नामांकित संस्थांनी गौरविलेले सिद्धहस्त लेखक बाबा भांड यांच्या खांद्यावर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचित.प्रश्न - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून अनेक दिग्गजांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. त्या पदावर काम करण्याची संधी आपणास मिळाली आहे, काय वाटते?उत्तर - मोठ्या संधी सोबतच ही मोठी जबाबदारीही आहे. अनेक दिग्गज, विचारवंतांनी या पदावर काम केले आहे. त्यामुळे या पदाचे मोठेपण आहे. आजच्या बदलत्या अभिरुचीची सांगड अभिजात साहित्याशी घालण्याचा प्रयत्न माझा राहील. ग्रंथव्यवहार हा सामाजिक जबाबदारीचे काम आहे. गेली चाळीस वर्षे साहित्य व्यवहार आम्ही सचोटीने व उच्च दर्जाची गुणवत्ता सांभाळत केला. त्या अनुभवाचा फायदा होईल.प्रश्न - मराठीची वाङ्मयीन संस्कृती कशी जपणार?उत्तर - साहित्य- संस्कृतीविषयक चिंतन करणारे, काम करणारे हे भारतातील राज्य पातळीवरील पहिले मंडळ आहे. मराठी भाषेतील मूलभूत संशोधन प्रकाशनाचे काम या महामंडळाच्या माध्यमातून झाले. या कामाची गती वाढविण्यासह वाङ्मयीन संस्कृती व आधुनिकतेची सांगड घालावी लागणार आहे. राज्यभरात पसरलेली हजारो लहान-मोठी ग्रंथालये, पुस्तके, साहित्य वितरित करणारे वितरक, वाचक आणि लेखक ही मंडळी वाङ्मयीन संस्कृती जपून आहे. परंतु इमारतीच्या रूपाने ग्रंथालये उभी राहिली म्हणजे वाचक तयार झाले व होतील, असे नाही. लेखकांना लिहितं करण्यापासून वाचक संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या गोष्टी वाढविणे हा संस्कृतीचा एक भाग आहे.प्रश्न : अध्यक्ष म्हणून मंडळातर्फे कोणत्या प्रकल्प, योजनांवर आपण काम करणार आहात.उत्तर - गेली ५० वर्षे साहित्य व्यवहाराशी मी निगडित आहे. त्यामुळे लेखक, प्रकाशकांच्या अडीअडचणी व वाचकांच्या भावभावना, इच्छा जाणून आहे. त्यामुळे काही प्रकल्प राबविण्याची संकल्पना तयार आहे. विशेषत: सर्जनशील नवलेखनासाठी विभागीय पातळीवर अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळांचे आयोजन करणे, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या शासनाच्या संस्थांना सोबत घेऊन काही लेखन-वाचन प्रकल्प संयुक्त राबविणे, विविध पुरस्कार-बक्षिसे या समित्यांवर दर्जेदार लेखकांना घेऊन नि:पक्ष कलाकृतींची निवड करणे, जुने अक्षर वाङ्मय- अभिजात साहित्याचा शोध घेऊन