लातूर : निलंबित केलेल्या २५ खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. लोकसभेत सभापतींनी २५ खासदारांना निलंबित केले आहे. केंद्र शासनाच्या सांगण्यावरून हे निलंबन केले आहे, असा आरोप करीत युवक काँग्रेसने गांधी चौकात जोरदार निदर्शने केली. भाजपा प्रणित केंद्र शासनाची ही कारवाई निषेधार्ह असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत गोजमगुंडे, कार्याध्यक्ष रघुनाथ मदने, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव विजय पारिख, अॅड. बाबा पठाण, सूरज राजे, गोविंद ठाकूर, सिद्धेश्वर धायगुडे, धनंजय गाडेकर, जावेद मणियार, अखिल शेख, तरबेज तांबोळी, विजय लांडगे, महम्मद खान, परमेश्वर पवार, कुणाल शृंगारे, अमोल चव्हाण, ए.आर. रहेमान, जयकुमार ढगे, असिफ पठाण, अयुब शेख, यशपाल कांबळे, अजय वागदरे, महेश काळे, किरण पवार, गुलाब चव्हाण, सूरज गडदे, देविदास वारुळे, अल्ताफ शेख यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
शहर विधानसभा युवक काँग्रेसची लातुरात निदर्शने
By admin | Updated: August 6, 2015 00:07 IST