औरंगाबाद : सिडको- हडकोत मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, सणासुदीच्या काळातच ५-५ तास उशिरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात खाजगी टँकर्सकडून पाणी विकत घ्यावे लागते आहे. उद्या १ सप्टेंबरपासून खाजगीकरणातून पाणीपुरवठा होणार असल्यामुळे मनपाचा पाणीपुरवठा विभाग याप्रकरणी काहीही बोलण्यास तयार नाही. समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराकडे मनपाने बोट दाखविण्यास ३१ आॅगस्टपासूनच सुरुवात केली आहे. रंजनवन सोसायटी एन-११, एन-१२, एन-८ भागात उशिरा पाणीपुरवठा होतो आहे. सायंकाळची ५ वाजेची वेळ असेल तर रात्री ११ वा. पाणीपुरवठा होतो आहे. जीटीएल किं वा महावितरण कंपनीच्या वीजपुरवठ्यातील दोषावर बोट ठेवून पालिका पळवाट शोधत आहे. पाणीपुरवठा वेळेत होत नसल्यामुळे महिलांना व मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीला गेल्या महिन्यात दोन ठिकाणी गळती लागली होती. त्यानंतर सिडको-हडकोत पाणीपुरवठ्याची बोंब होण्यास सुरुवात झाली.
सिडको-हडकोत पाण्याची बोंबाबोंब
By admin | Updated: September 1, 2014 00:46 IST