उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्याजवळील भोगावती नदीच्या पात्रात असलेल्या एका चाईनीज स्टॉलवर शुक्रवारी दिवसभर गप्पा ठोकत बसणाऱ्या दोन अल्पवयीन मुला-मुलींना छेडछाड विरोधी पथकाने चांगलाच चोप दिला़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या चौपाटीवर महाविद्यालयीन दोन मुले, दोन मुली सकाळी जवळपास ११ ते ११़३० वाजल्यापासून एका स्टॉलमध्ये बसले होते़ स्टॉल चालकाने दिवसातून जवळपास चार-पाच वेळेस त्यांना उठून जाण्याबाबत सांगितले़ मात्र, गप्पा मारण्यात मश्गुल असलेल्या त्या मुला-मुलींनी दुकानदाराच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले़ त्यानंतर पुढील संभाव्य धोके पाहता स्टॉल चालकाने शहर पोलिस ठाण्याजवळील छेडछाड विरोधी पथकास माहिती दिली़ या माहितीवरून पथक प्रमुख माया दामोदरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौपाटी गाठून त्या चौघांना शहर पोलिस ठाण्यात आणले़ त्यांना कसून चोप देत पालकांना बोलावून घेण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पालकांना बोलावून समज देण्याची कारवाई सुरू होती़ दरम्यान, छेडछाड विरोधी पथकाने आज केलेल्या या कारवामुळे शहरात बिनधास्त वावरणाऱ्या प्रेमीयुगुलांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)
‘टाईमपास’ करणाऱ्या तरूण-तरूणींना चोप
By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST