शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

बालकामगारांची शोधमोहीम

By admin | Updated: June 18, 2014 01:44 IST

जालना : शहरात काही प्रतिष्ठानांवर बालकामगार काम करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १५ जून रोजीच्या अंकातून प्रसिद्ध होताच कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकांनी बालकामगारांची शोध मोहीम सुरू केली आहे.

जालना : शहरात काही प्रतिष्ठानांवर बालकामगार काम करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १५ जून रोजीच्या अंकातून प्रसिद्ध होताच कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकांनी बालकामगारांची शोध मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी काही प्रतिष्ठानांची या पथकांकडून तपासणी करण्यात आली. मात्र कारवाईसंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ‘लोकमत’ ने स्टींग आॅपरेशनद्वारे हा प्रकार उजेडात आणला. शहरातील बहुतांश उपहारगृहे, दुकाने, ढाबे, गॅरेज आदी ठिकाणी बालकामगार अक्षरश: ढोर मेहनत करताना आढळून आले होते. शासनाच्या नियमांची ऐसी की तैसी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. विशेष म्हणजे बालकामगार विरोधी दिन सरकारी पातळीवर गेल्या आठवड्यातच साजरा करण्यात आला. मात्र त्याचा परिणाम दिसून आला नव्हता. नवीन व जुना जालना भागात एकूण तीनशेपेक्षा अधिक छोटी-मोठी उपहारगृहे आहेत. यातील काही उपहारगृहांमध्ये १२ ते १५ या वयोगटातील बालकामगारांची संख्या अधिक होती. याबाबतचे छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित होताच, कामगार अधिकारी कार्यालयाने आपल्या पथकांद्वारे बाल कामगारांची शोध मोहीम हाती घेतली. सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही प्रतिष्ठानांची या पथकांनी तपासणी केल्याचे समजते. विशेषत: बसस्थानक, मामा चौक, महावीर चौक, सुभाष रोड या भागात तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काही प्रतिष्ठानांवर ‘येथे बालकामगार नाहीत’ अशा आशयाच्या पाट्या लावलेल्या असतात. परंतु यापैकी काही ठिकाणी बालकामगार काम करताना आढळतात. हा प्रकार सर्वांसमक्ष सुरू असतानाही प्रत्यक्षात संबंधित यंत्रणेकडून काहीच कारवाई होत नाही. (प्रतिनिधी)शोधमोहीम अखंडित ठेवाजालना शहरात झोपडपट्ट्यांची संख्या ५५ एवढी आहे. या झोपडपट्ट्यांमधील बालकामगारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. कामगार अधिकारी कार्यालयाने यापूर्वीही शोधमोहीम राबविली, नव्हे शोधमोहीम ही अखंडितपणे सुरू असते, असे याच कार्यालयाकडून सांगण्यात येते. ज्या प्रतिष्ठानांमध्ये बालकामगार आढळून येतील, तेथील संचालकांविरुद्ध पोलिस कारवाई करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या दिवशी किती प्रतिष्ठानांची तपासणी केली व किती बालकामगार आढळून आले, हे समजू शकले नाही.