शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाणीपुरवठा आणि अतिक्रमणांचे आव्हान

By admin | Updated: August 31, 2014 00:41 IST

औरंगाबाद : सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी मिळून नगर परिषद अस्तित्वात आली असून, नव्या नगर परिषदेसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे

औरंगाबाद : सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी मिळून नगर परिषद अस्तित्वात आली असून, नव्या नगर परिषदेसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे ते नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे. किती दिवसांत पाणी मिळणार या प्रश्नाचे उत्तर नागरिकांना हवे आहे. नाल्यांवर तसेच इमारतींचे झालेले बेकायदा बांधकाम हटविण्याचेही मोठे आणि अवघड काम नगर परिषदेला करावे लागणार आहे. मागील दहा वर्षांत सातारा परिसरात स्वतंत्र घरे तसेच अपार्टमेंट इतक्या वेगाने वाढले आहेत की, त्या भागात सोयी-सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेले. वसाहती वाढत असताना ग्रामपंचायतींचे सदस्य मागील दहा वर्षांत केवळ राजकारणात गुंतल्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्तेबांधणी, ड्रेनेजलाईन, विजेच्या दिव्यांची सोय या आवश्यक सुविधा नागरिकांना मिळाल्या नाहीत. जुन्या गावाच्या परिसरात तसेच नव्याने वसलेल्या काही वसाहती वगळल्यास या भागाचा संपूर्ण पाणीपुरवठा हा विंधनविहिरी तसेच खाजगी टँकरच्या भरवशावरच राहिला. सद्य:स्थितीला या दोन्ही गावांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५० हजार इतकी आहे. मागील तीन वर्षांत ही संख्या आणखी वाढली आहे. सद्य:स्थितीत ही संख्या ६० हजारपेक्षाही जास्त आहे. भारतात पाणी वापराच्या मानकानुसार प्रत्येक नागरिकाला दररोज कमीत कमी १३५ लिटर पाणी मिळायला हवे. त्यामुळे सातारा- देवळाई या नव्या शहराच्या साठ हजार लोकसंख्येला दररोज ८० लाख लिटरपेक्षाही जास्त पाण्याची गरज आहे. नगर परिषद अस्तित्वात आल्याने या भागात साहजिकच नागरिकांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढणार आहे. प्रत्यक्षात पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येईपर्यंत या शहराची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास जाईल. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन व्हायला पाहिजे. सातारा- देवळाईसाठी पाणी कोठून मिळणार हा प्रश्न आहे. याबाबत मागील काही वर्षांत काहीच हालचाल झालेली नाही. ग्रामपंचायतीकडेही याबाबतचे काही नियोजन नव्हते. शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या जलवाहिनीतून किंवा नक्षत्रवाडी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी देता येऊ शकते का, याबाबत विचार होऊ शकतो. मात्र, या प्रश्नाचे उत्तर अधांतरीच आहे. यामुळे नव्या नगर परिषदेसमोर लवकरात लवकर आणि कोणत्या स्रोतातून पाणी मिळणार हे ठरविण्याचे मोठे आव्हान आहे. बेकायदा बांधकामसातारा आणि देवळाई परिसरात नाल्यांवर तसेच ठिकठिकाणी नागरिक व बिल्डरांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. दोन दिवसांपूर्वी नाला बुजविल्याचे प्रकरण समोर आले आहे. नगरनियोनाच्या दृष्टीने अतिक्रमण काढणे आणि नैसर्गिक नाले मोकळे करणे हे मोठे आव्हान आहे. सातारा परिसरातील अनेक नाले बुजविण्यात आले आहेत. विद्यमान प्रशासक आणि तहसीलदार विजय राऊत यांना प्रशासकपदाच्या काळात नगर परिषद अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीबरोबरच बेकायदा बांधकामे काढण्याचे आव्हान असणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक होण्यापूर्वीच काही करता आले तर ते शक्य होणार आहे. विद्यमान प्रशासकांनी ते धाडस दाखवावे, अशी नागरिकांची अपेक्षा असणार आहे.