जालना : शहरातील आनंदनगर, आदर्श नगर, जयनगर व रेल्वे कर्मचारी जालना जयंती उत्सव समितीच्या वतीने आगळी वेगळ्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता अभियान राबवून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. वरील विभागात दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात भीमजयंती साजरी करण्यात येते. यंदा मात्र स्वच्छता अभियान तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवून वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचा नागरिकांचा मानस आहे.समितीने असे केले आवाहन आपल्या घराच्या आजूबाजूच्या किमान २० फुटापर्यंतचा परिसर स्वच्छ करावा. घरावर शांततेचा संदेश देणारा पंचशील ध्वज लावावा.महिलांनी सकाळी अंगणात सडा, सारवण करुन आकर्षक रांगोळ्या काढाव्यात. ५ एप्रिल रोजी साथीचे रोग, स्वाईन फ्लू, डेंग्यू, क्षयरोग आदी रोगांचा नायनाट करण्यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमासाठी अध्यक्ष डी.आर. सावंत, उपाध्यक्ष तुकाराम मोरे, संदीपान दासूद, राजू शिंदे, सुशांत नावकर, एस.डी.उघडे, अशोक तपासे, रत्नाकर लांडगे आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)याविषयी रत्नाकर लांडगे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्रच उत्साहात साजरी केली जाते. यंदा आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्यााचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहचविण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. यासाठी नागरिकांना स्वच्छतेचे महत्व तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी ५ एप्रिल रोजी सकाळी सात ते दहा या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
स्वच्छतेचा संदेश देऊन करणार भीमजयंती साजरी
By admin | Updated: April 4, 2015 00:32 IST