उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतदार संघात प्रचार रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवाराच्या खर्चावर निवडणूक विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. उस्मानाबाद विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील खर्च सादर केला आहे. आजवर १७ जणांनी ६ लाख १२ हजार रूपयांवर खर्च केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर हे खर्चामध्ये आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वबळावर लढत आहेत. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून १५ जणांनी माघार घेतल्यानंतर आखाड्यामध्ये २० उमेदवार उरले असून, यामध्ये आठ अपक्षांचा समावेश आहे. सध्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभाही घेतल्या जात असून कॉर्नर बैठका, पदयात्राही काढल्या जात आहेत. यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. या खर्चावर निवडणूक विभागाची पथके नजर ठेवून आहेत. निवडणूक आयोगाने दररोजच्या खर्चासाठी त्यांच्या स्तरावर नोंदवही ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारांच्या निरीक्षणांसाठी एका अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी केलेल्या खर्चाची नोंद घेतली जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी १ लाख ४९ हजार ६३९ रूपये खर्च केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे आहेत. त्यांनी आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३५२ रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपाचे संजय पाटील दुधगावकर यांनीही ८३ हजार ३४४ रुपयांचा खर्च केला आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार विश्वास शिंदे हे असून, त्यांनीही ४३ हजार ४१७ रुपयांचा खर्च केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)अनिल उत्तमराव हजारे यांनी ७ हजार ३५० रुपये, धनंजय मुरलीधर तरकसे पाटील यांनी १४ हजार १३० रूपये, मधुकर गायकवाड ५ हजार ५३१ रुपये, डॉ.रमेश बनसोडे ६ हजार ८० रुपये, संजयकुमार यादव ४१ हजार ४०० रुपये, अकबरखान गुलाबखान पठाण ३५ हजार ६० रुपये, अनिल उत्तमराव हजारे ७ हजार ५३० रुपये तर मधुकर गायकवाड यांचा ५ हजार ५३१ रूपये खर्च झाला असल्याची नोंद निवडणूक विभागाच्या दप्तरी आहे.अपक्षही खर्चात नाहीत मागे४उस्मानाबाद मतदार संघातील अपक्ष उमेदवार अनंत चोंदे यांनी ३० हजार ८२० रुपये, राजाभाऊ उर्फ राजेंद्र ओव्हाळ ५ हजार ९४६ रुपये, किरण टेकाळे १० हजार ६०० रुपये, बालाजी तुपसुंदरे ५ हजार ३०० रुपये, पांडूरंग भोसले १० हजार ६०० रुपये, प्रदिप जाधव १० हजार २०० तर हाजीभाई हन्नुरे यांनी ११ हजार रुपये इतका खर्च केला आहे.दोघांना नोटिसाउमरगा विधानसभा मतदार संघातील दोन उमेदवारांनी निवडणूक खर्चासंदर्भात माहिती सादर न केल्याप्रकरणी बहुजन समाज पार्टीचे दत्ता गायकवाड व रिपब्लिकन पार्टीचे विद्या आबाराव वाघमारे या दोन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. चोवीस तासांमध्ये स्वत: अथवा प्रतिनिधीमार्फत लेख्यांसह उपस्थित रहावे, असे नोटिसीत नमूद केले आहे.तिघांचा खर्च सादर नाही४उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातून अद्याप तिघांनी खर्च सादर केलेला नाही. यामध्ये अॅड. जयराम घुले, उमेश भालेराव व प्रा. पोपट रणदिवे या तीन उमेदवारांचा समावेश आहे. सदरील तीनही उमेदवार खर्चाच्या तपासणीवेळी गैरहजर राहिल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
उमेदवारांनो, होऊ द्या खर्च !
By admin | Updated: October 7, 2014 00:15 IST