लातूर : लोकसभेपाठोपाठ लागलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतच लातूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीनेही रणधुमाळीत रंग भरले आहेत़ प्रभाग क्रमांक १३ अ मधील जागा नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आल्याने रिक्त झाली आहे़ या जागेसाठी पोटनिवडणूक लागली असून, आतापर्यंत ५ जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहे़ ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती़ ती राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे़ तर गतवेळी दुसर्या स्थानी राहिलेला बसपाचा ‘हत्ती’ धडक देण्याच्या तयारीत आहे़लोकसभेची रणधुमाळी थंडावण्यापूर्वीच पदवीधर मतदासंघाची रणधुमाळी सुरु झाली आहे़ त्यातच लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीचा ज्वर हळुहळु भरतो आहे़ प्रभाग १३ अ मधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड़व्यंकट बेद्रे यांनी १५७३ मते मिळवीत एकतर्फी विजय मिळविला होता़ परंतु, त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप करुन न्यायालयात दावा करण्यात आला होता़ त्यानुसार अॅड़बेद्रे यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद रिक्त घोषित करण्यात आले़ या जागेवर आता पोटनिवडणूक लागली असून, आतापर्यंत महानगरपालिकेतून ५ जणांनी उमेदवारी अर्ज नेण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ़धनंजय जावळीकर यांनी दिली़ १० जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे़ त्यामुळे उमेदवार निवडीच्या पक्षांतर्गत प्रक्रियेला वेग आला आहे़ काँग्रेसने इच्छुकांची चाचपणी सुरु केली असून, त्यांच्याकडून अर्ज घेण्यात येत आहेत. मागील वेळी बसपाने दुसर्या क्रमांकाची मते घेतल्यामुळे मागच्याच उमेदवाराची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे भाजपानेही चाचपणी सुरु केली असून, त्यांचाही उमेदवार कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे़मोर्चेबांधणी सुरु; काँग्रेस गाठणार पन्नाशी?महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने ७० पैकी ४९ जागा पटकावून बहुमत मिळविले होते़ त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक पप्पू गायकवाड यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली होती़ ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीकडून खेचून आणत पालिकेतील नगरसेवकांची ‘फिफ्टी’साजरी केली होती़ परंतु, हा आनंद त्यांना फार काळ टिकविता आला नाही़ अॅड़व्यंंकट बेद्रे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही जागा रिक्त होऊन काँग्रेसची संख्या पुन्हा ४९ झाली़ ही जागा आपल्याकडे राखून पुन्हा पन्नाशी गाठण्यासाठी काँग्रेस उत्सुक असल्याचे सांगत उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड़समद पटेल यांनी सांगितले़ आतापर्यंत ६ इच्छुकांनी अर्ज केले आहेत़ ७ जूनपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असून ८ किंवा ९ जून रोजी उमेदवारीसाठी मुलाखती होणार असल्याचे अॅड़पटेल म्हणाले़ दुसरीकडे भाजपानेही तयारी सुरु केली असून गतवेळी त्यांच्याकडून निवडणूक लढविलेल्या जितेंद्र कांबळे यांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ त्यांनी मनपातून उमेदवारी अर्जही विकत नेला आहे़ दरम्यान, बसपाचे विजय अजनीकरही पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत़पक्षांकडून चाचपणी सुरू...प्रभाग क्रमांक १३ अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे़ या प्रभागात दलित मतांची संख्या लक्षणीय आहे़ या प्रभागातून मागील वेळी अॅड़व्यंकट बेद्रे यांनी १५७३ मते मिळवून विजय संपादन केला होता़ बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीत चांगलीच लढत दिली़ त्यांचे उमेदवार विजय अजनीकर हे ९१० मते मिळवून दुसर्या क्रमांकावर राहिले़ भाजपाचे जितेंद्र कांबळे ४३८ मते मिळवून तिसर्या तर राष्ट्रवादीचे शिवप्रसाद श्रृंगारे २८१ मते मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले होते़ तब्बल ९ उमेदवारांनी या निवडणुकीत नशीब आजमावले होते़ आता यावेळी काँग्रेस कोणता उमेदवार देतो, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे़
रणधुमाळीत पोटनिवडणुकीने भरले रंग
By admin | Updated: June 6, 2014 01:04 IST