गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सावंगी ग्रुप ग्रामपंचायत मिनी नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. यामुळे शासकीय अनुदान तसेच कर कसुली मोठ्या प्रमाणात होते; मात्र या ग्रामपंचायतीवर आमदार प्रशांत बंब यांचा वरचष्मा आहे. यंदाच्या निवडणुकीत आ. बंब यांचे राजकीय विरोधक शिवसेनेचे संपत छाजेड हे बंब यांच्या गोटात गेले आहेत. शिवसेनेचे दोन गट झाले असून दुसरा गट बहुजन वंचित आघाडी सोबत गेला आहे.
चौकट
या वॉर्डांकडे गावचे लक्ष
वाॅर्ड क्र. ४ मधून संपत छाजेड हे बिनविरोध निवडून आले. वाॅर्ड क्र.५ मधून नारायण वाकळे व महिला उमेदवार सुनंदा कांजूने बिनविरोध निवडून आले आहेत. गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवसेना व वंचित गटाचे उमेदवार संजय जैस्वाल यांच्यासमोर बंब गटाचा बावीस वर्षीय मयूर जैस्वाल उभा आहे. त्यामुळे या वॉर्डाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
संपत छाजेड सोबत आल्याने बंब यांची ताकद वाढली
लासूर स्टेशन सावंगी ग्रुप ग्रामपंचायतीवर आ. प्रशांत बंब यांचे वर्चस्व आहे. त्यातच संपत छाजेड सोबत आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. मात्र शिवसेना व वंचितच्या पॅनलला माजी सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी पाठिंबा दिल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. साखर कारखान्यातील अपहारप्रकरणी आ. बंब व कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.