उस्मानाबाद : धान्य वितरण व्यवस्थेतील अनागोंदीला चाप बसावा, पर्यायाने तळागळातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यात रेशनदुकानातील भष्ट्राचारावर नियंत्रणासाठी सर्व प्रक्रिया पारदर्शक करण्यात येत आहेत. हे यंत्रे शहरासह ग्रामीण भागात लवकरच बसविण्यात येणार आहेत. बायोमेट्रिकमुळे रेशनधारक कुटुंबातील कोणताही सदस्य रेशन दुकानात गेल्यास त्यांच्या अंगठयाचा ठसा घेण्यात येणार आहे. यंत्रावर ठसा उमटला की त्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत? त्यांना मिळणारा रेशन कोटा किती? आदी बाबतची माहिती नागरिकांना ‘स्क्रीनवर’ दिसणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ‘आॅनलाईन’ असल्याने दुकानात किती प्रमाणात धान्यांचा साठा झाला? याची माहिती आपोआप नोंद होते. त्यामुळे आता बोगसगिरीला बऱ्यापैैकी चाप बसेल, असा दावा पुरवठा विभागाकडून केला जात आहे.रेशन दुकानाना दर महिन्याला धान्य व रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक लाभार्थी धान्य व रॉकेल घेऊन जात नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा रेशनदुकानावर कोटा शिल्लक राहत असतो. परंतु अनेका वेळा काही रेशनदुकानदार धान्य वितरित केल्याचे सांगून ते धान्य काळाबाजारात विक्री करतात. त्यामुळे अशा गैैरप्रकारांना आळा बसून वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
आता रेशन दुकानांना लागणार बायोमेट्रिक !
By admin | Updated: August 11, 2014 01:53 IST