शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता प्रकल्प मार्गी लावणार

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर हा नैसर्गिक साधनसामग्री व जैविक विविधतेने नटलेला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर हा नैसर्गिक साधनसामग्री व जैविक विविधतेने नटलेला आहे. या परिसराच्या विकासासाठी जैवविविधता (‘बायोडायव्हर्सिटी पार्क’) हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही रोहयो व जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रोजगार हमी योजना, तसेच जलसंधारण विभागातर्फे राज्यभरात विद्यार्थी, पालक व नागरिक यांच्यासोबत संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी विद्यापीठामध्ये ‘दुष्काळ, पाणीटंचाई निर्मूलन’ या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. व्यासपीठावर राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. एच. एम. देसरडा व कुलसचिव डॉ. धनराज माने यांची उपस्थिती होती. या प्रसंगी नितीन राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, मागील पाच वर्षांत ३ हजार २१८ बंधाऱ्यांचे काम हाती घेतले. यापैकी २ हजार बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले. परिणामी, मराठवाड्यात मोसंबी व डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात बहरल्या. कार्यक्रमाचे बीजभाषण डॉ. देसरडा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. माने यांनी केले. डॉ. चेताना सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. राजेश करपे यांनी आभार मानले. ३१ कोटींचे प्रस्ताव सादरकार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू डॉ. चोपडे व कुलसचिव डॉ. माने यांनी मंत्री राऊत यांना दोन प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये विद्यापीठ परिसरातील विहिरींची खोली वाढविणे व बांधणी करणे, हा १० कोटी रुपयांचा व दुसरा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ हा २१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.