उस्मानाबाद : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ उस्मानाबाद, कळंब, उमरगा, तुळजापूर आदी ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी दुचाकी ढकलत नेत अनोखे आंदोलन केले़ यावेळी केंद्र शासनाच्या निषेधार्थच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते़कळंब येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली येथील ढोकी नाका येथून या आंदोलनास प्रारंभ झाला़ ही रॅली शिवाजी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ़बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गे केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत दुचाकी ढकलत नेण्यात आली़ या आंदोलनात विलास करंजकर, विशाल बारसकर, अनंत घोगरे, तय्यब हाश्मी, सुझानंद वरपे, सुभाष वाघमारे, संजय गरड, समीर बागवान, विजय गायकवाड, बाळासाहेब शेळके, प्रकाश भोसले, पृथ्वीराज देशमुख, दिग्विजय पाटील, बाळू लोकरे, मुनीर पठाण, संजय सोनवणे, प्रशांत घोगरे, रवि पुरी, सागर घोगरे, सुनील पाटील, अनंत बारटक्के, गजानन मुंडे, राहुल वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते़उमरगा येथे राष्ट्रीय महामार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, प्रा़डीक़ेक़ांबळे, तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, नगरसेवक विजय दळगडे, अतिक मुन्शी, सतीश सुरवसे, विजय वाघमारे, राम धोत्रे, सुभाष घोडके, कमलाकर मंमाळे, आयुब जमादार, प्रदीप गिरीबा, महेश माशाळकर, बाळू परांडे, चंद्रशेखर पवार, बंडू पवार, अजय वाघमारे, शिवा मुरमे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मोदी सरकारकडून सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेकतुळजापूर : ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली आहे. दरवाढ कमी करण्याऐवजी वाढविली जात आहे. पेट्रोल, डिझेल भाववाढ आणि रेल्वेची भाडेवाढ करुन तर प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप तुळजापूर येथील आंदोलनावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. निवडणुकीपूर्वी मोदींनी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विसर पडू लागला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलसोबतच रेल्वे भाडेवाढही मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य नागरीक महागाईच्या कचाट्यात सापडला आहे. ही सर्व दरवाढ आणि भाडेवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सकाळी तुळजापूर शहरातील सावरकर चौकातून काँग्रेसच्या वतीने मोटारसायकल ढकल मोर्चा काढला. हा मोर्चा बसस्थानक चौक, आंबेडकर चौक, भवानी चौक, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ मार्गे नेण्यात आला. मोर्चामध्ये पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि. प. सदस्य धीरज पाटील, सभापती सचिन पाटील, अशोक मगर, भारत कदम, सुनील रोचकरी, राजेंद्र शेंडगे, शांताराम पेंदे, तानाजी जाधव, विनित कोंडो, लखन पेंदे, सीताराम शिंगे, आण्णाप्पा पवार, अविनाश रसाळ, शाहू मगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.
दुचाकी ढकल मोर्चा
By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST