गणेश बन्सीलाल गांगवे (रा. एपीआय कॉर्नर) हे बुधवारी रात्री १२ वाजता मित्राचा वाढदिवस साजरा करून कारने जालना रोडवरून घरी जात होते. तेव्हा आकाशवाणी चौकाजवळ रस्त्यावर अर्धा गोलाकार स्थितीत काही बाइकस्वार उभे होते. त्यांना पाहून गणेश हॉर्न वाजवून पुढे निघाले. बाइकस्वारांनी त्यांचा पाठलाग केला. पिवळ्या दुचाकीवरील तरुणांनी त्यांच्या कारच्या काचेवर थापा मारल्या. टोळके पाहून गणेश यांनी कार न थांबविता ते पुढे निघाले. यामुळे टोळके त्यांचा पाठलाग करीत अग्रसेन महाराज चौकापर्यंत आले आणि त्यांनी गणेश यांना धावत्या दुचाकीवरून चाकू दाखविला. यामुळे घाबरलेल्या गणेश यांनी त्यांची कार पुढे जोरात नेली आणि घर गाठले. या घटनेविषयी त्यांनी सिडको ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.
बाइकस्वार टोळक्याची जालना रस्त्यावर दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST