पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी मोठी यात्रा भरते़ यात्रेत नर्तिका नाचविणे कायदेशीर गुन्हा आहे मात्र येथे राजरोसपणे नर्तिका नाचविण्यात आल्या़ दरम्यान, नियम डावलून नर्तिका नाचविताना तेथे पोलिसही उपस्थित होते़ परंतु स्थानिक पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली़ सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविण्याची परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे़ मात्र दोन वर्षांपासून यात्रेत नर्तिका नाचविण्यावर बंदी घालण्यात आली़ गतवर्षीही नर्तिका नाचविल्या नव्हत्या़ मात्र यावर्षी यात्रेच्या महिनाभरापूर्वीच गावकऱ्यांनी नर्तिका नाचविण्यास परवानगी द्यावी, यासाठी गावकरी आग्रही होते़ प्रशासनाने फक्त बंदिस्त तंबूतील कार्यक्रमास परवानगी दिली होती मात्र येथे राजरोस उघड्यावर नर्तिका नाचवून नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार घडला़दरम्यान, यावेळी तेथील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता़ परंतु नियम डावलून नर्तिका नाचविल्या जात असताना पोलिसांनी साधे हटकण्याचीही तसदी घेतली नाही़ दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ दुसरीकडे मंदिराशेजारीच नर्तिकांचे पाच डाव रंगले होते़ हा संपूर्ण प्रकार कायद्याचे उल्लंघन करणारा असतानाही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली़नर्तिकांसाठी न्यायालयात धावसौताडा येथील यात्रेत नर्तिका नाचविण्यास परवानगी मिळावी यासाठी गावातील काही जण इतके उत्साही होते की त्यांनी सुरुवातीला पोलिसांकडे अर्ज केले़ त्यानंतर तहसीलदारांना साकडे घातले़ पोलिसांनी सपशेल नकार दिल्यानंतर गावकऱ्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले़ त्यानंतर तहसीलदारांनी बंदिस्त तंबूत कार्यक्रम घ्यावेत, असे आदेश दिले होते़ (वार्ताहर)
सौताड्यात छमछम्
By admin | Updated: August 12, 2014 01:56 IST