पैठण : जायकवाडीवरील धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत ११०२५ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. आवक आज मध्यरात्रीनंतर दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. आज रोजी धरणात ३० टक्के जलसाठा झाला आहे. धरणात १५०५ फुटापर्यंत पाणी आले असले तरी असून धरण तब्बल १७ फूट रिकमे आहे.जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. दारणा धरणातून २०४३५, गंगापूर २४१२, नांदूर मधमेश्वर प्रकल्प ८९३८, ओझर वेअरमधून २८३० व निळवंडे धरणातून ५८४९ क्युसेक्स असा मोठा विसर्ग होत आहे. यामुळे धरणात ११०२५ क्युसेक्स क्षमतेने आवक होत आहे. (वार्ताहर)१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी १५०५.८७ फुटावर गेली आहे. धरणात एकूण जलसाठा १३८४.१८२ द.ल.घ.मी. झाला असून यापैकी ६४६.०७६ द.ल.घ.मी. जिवंत उपयुक्त जलसाठा आहे.
जायकवाडीतील आवक दुपटीने वाढली
By admin | Updated: September 6, 2014 00:42 IST