परभणी: स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत परभणी शहरात एका पिस्तुलासह सहा जिवंत काडतूस व इतर शस्त्रे जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अनंत रोकडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकण्यात आला. त्यात झरी येथील अनिलसिंग नकलूसिंग बावरी याच्या ताब्यातून परभणी येथून एक पिस्तूल, सहा जीवंत काडतुस, एक तलवार आणि चार जांबिये पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील डोंगरे, माने बोईनवाड, भुजबळ, धुळगुंडे, चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)
परभणीत पिस्तुलासह शस्त्र जप्त
By admin | Updated: September 14, 2014 23:37 IST