परभणी: जिल्ह्यातील ७ नगरपालिका अध्यक्षपदाची निवड ११ जुलै रोजी होत आहे. पाथरी, पूर्णा, सोनपेठ न. प. अध्यक्षपदासाठी १ तर गंगाखेड, जिंतूर, सेलू व मानवत येथील न. प. अध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज आले आहेत.पाथरी : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी ८ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुनेद खान दुर्राणी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदासाठी निवड जवळपास निश्चित झाली आहे़अडीच वर्षाचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले आहे़ आ़ बाबाजानी दुर्राणी यांची या नगरपालिकेमध्ये एकहाती सत्ता आहे़ अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ पैकी १९ नगरसेवक निवडून आले होते़ मंगळवारी दुपारी नगराध्यक्षपदासाठी आ़ बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद खान दुर्राणी यांनी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला़ माजी नगराध्यक्ष तबरेज खान दुर्राणी, माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी, अनिल पाटील, लालू खान, अफसर अन्सारी, अनिल ढवळे, नारायण पितळे, सुनील हरकळ यांची उपस्थिती होती़ सेलू : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून गटनेते सुरेश कोरडे यांनी तर शिवसेनेचे नगरसेवक संजय धापसे यांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी नगर परिषद कार्यालयात प्रभारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आसाराम छडीदार यांच्याकडे दाखल केले आहेत़ दरम्यान, काँग्रेसचे दोन्हीही गट एकत्र आल्यामुळे सुरेश कोरडे हे नगराध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित मानले जात आहे़ नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुरेश कोरडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ त्यांच्या अर्जाला सुचक म्हणून नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी तर अनुमोदक म्हणून शोभा रघुनाथ बागल यांची नावे आहेत़ दुपारी एक वाजता शिवसेनेचे नगरसेवक संजय धापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ नगरसेविका मंगलताई कथले, संध्या चिटणीस, संदीप लहाने, अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, कुणाल लहाने आदीजण उपस्थित होते़ नगराध्यक्षपद हे ओबीसी साठी आरक्षित असल्यामुळे काँग्रेसकडून सुरेश कोरडे व विमलबाई तरटे यांच्यात रस्सीखेच होती़ परंतु आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी सुरेश कोरडे यांच्या नावाला पसंती दिल्यामुळे मंगळवारी त्यांचा उमेदवारी दाखल केला़मानवत : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मानवत नगरपालिकेत पक्षीय बलाचा विचार करता कॉँग्रेस १४, राष्ट्रवादी कॉँग्रेस ३, शिवसेना १ अशी स्थिती आहे. त्यामुळे नगराध्यक्ष कॉँग्रेसचाच होणार यात शंका नाही. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्यामुळे या ठिकाणी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, कॉँग्रेसचे नेते बालकिशन चांडक आणि नगरसेवक यांच्यात चर्चा होऊन वरील प्रमाणे ठरावही झाला होता. परंतु ऐनवेळी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बालकिशन चांडक यांच्या स्नुशा सपना रविराज चांडक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी सुशिलाबाई बालाजी लाड, सीमा शिवनारायण सारडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिंतुरात दोन अर्ज जिंतूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अडीच वर्षासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे़ या पदासाठी काँग्रेसच्या वतीने नगरसेविका साधना पंडीतराव दराडे यांनी उमेदवारी अर्ज ७ जुलै रोजी दाखल केला़ त्यांच्या समवेत विद्यमान नगराध्यक्ष सचिन गोरे, गटनेते अॅड़ गोपाळ रोकडे, गणेश कुऱ्हे, अशोक बहिरट, राजेश राठोड, जि़ प़ माजी उपाध्यक्ष वसंत शिंदे, सलीम तांबोळी, डॉ़ पंडीत दराडे आदींची यावेळी उपस्थिती होती़ ८ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला़ राकाँच्या वतीने विद्यमान नगरसेविका कल्पना मनोहर डोईफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ कपील फारुखी यांच्यासह राकाँचे सात नगरसेवक उपस्थित होते़
नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल
By admin | Updated: July 9, 2014 00:09 IST