शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

अबब! ७२ टक्के लोकांना ‘टेंशन’!

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

संजय तिपाले / राजेश खराडे , बीड बिझी शेड्यूल, कामाचा व्याप अन् शरीरस्वास्थ्याकडे होणारे कमालीचे दुर्लक्ष यामुळे थोडेथोडके नाही तर तब्बल ७२ टक्के लोक ‘टेंशन’खाली असतात

संजय तिपाले / राजेश खराडे , बीडबिझी शेड्यूल, कामाचा व्याप अन् शरीरस्वास्थ्याकडे होणारे कमालीचे दुर्लक्ष यामुळे थोडेथोडके नाही तर तब्बल ७२ टक्के लोक ‘टेंशन’खाली असतात. प्रसिद्ध दिवंगत अभिनेता देवानंद यांच्या ‘हम दोनो’ चित्रपटातील एक गाणे अजही अनेक जण गुणगुणत असतात. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवें मे उडाता चला गया..’ असे ते गीत आहे. तणावमुक्तीसाठी व्यसने करणाऱ्यांकडे पाहिल्यावर या गीताचा प्रत्यय येतो. आजही ५५ टक्के लोक तणाव विसरण्यासाठी व्यसनाचाच आधार घेतात. व्यायामासाठी निम्म्याच लोकांकडे वेळ आहे. महिलांमध्ये तर व्यायामाविषयी प्रचंड उदासीनता असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आणला.ताण- तणावमुक्तीच्या संदर्भाने नागरिकांपुढे ठेवलेल्या प्रश्नावलीतून विविधांगी बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी व्यवसायिक, नोकरदार, विद्यार्थी व घरकामात रमलेल्या महिलांची मते नोंदविण्यात आली. किती तास काम करता? या प्रश्नाचे उत्तर शोधले तेंव्हा ८ ते १० तास काम करणाऱ्यांचा टक्का ६५ इतका आढळला. ११ ते १४ तास काम करणारे २५ टक्के लोक आहेत तर १४ तासांपेक्षा अधिक काम करणाऱ्यांचा टक्का १० इतका आहे. सुमारे ७२ टक्के लोक तणावात असतात. कधी-कधीच तणावात असणारे २० टक्के नागरिक असून ‘टेंशनफ्री’ लोकांचा टक्का केवळ ८ टक्के इतकाच आहे. तणावाची सर्वसाधारण कारणे जाणून घेतली तेंव्हा टिचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी झुंजणाऱ्यांनाच तणावाने सर्वात जास्त ग्रासले असल्याचे पुढे आले आहे. जीवनाचा रहाटगाडा चालविण्यासाठी लोक करत असलेल्या कामाचे टेंशन घेऊन जगणाऱ्यांचा टक्का ७२ इतका आहे. कौटुंबिक कलहामुळे १३ टक्के लोकांना तणावाला सामोरे जावे लागते तर अन्य कारणांमुळे १५ टक्के लोकांना टेंशन येते. तणावातून बाहेर पडण्यासाठी काय करता? या प्रश्नाला पर्याय होते व्यायाम, मनोरंजन, पिकनिक व अन्य असे चार पर्याय! व्यायामासाठी केवळ ५३ टक्के लोकांना वेळ आहे. मनोरंजनातून तणावमुक्ती मिळविणाऱ्यांची टक्केवारी ३४ असून पिकनिकसाठी केवळ ८ टक्के लोकच जातात. अन्य उपायांतून ५ टक्के लोक तणावाशी लढा देतात. तणावमुक्तीसाठी व्यायाम करणाऱ्यांकडून पद्धती जाणून घेतली तेंव्हा योगासनाचा पर्याय सर्वाधिक ५८ टक्के लोकांनी निवडल्याचे निष्पन्न झाले. २४ टक्के लोक मॉर्निंग वॉक, १० टक्के लोक ईव्हिनींग वॉक करतात तर प्राणायमला ८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. व्यसनाचा आधार घेता का? या प्रश्नाला ५५ टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले. ‘मुझे पिने का शौक नही.. पिता हूँ गम भुलाने को ...’ अशाच काहीशा भावनेतून २८ टक्के लोक व्यसनाचा पर्याय निवडतात. टेंशनमध्ये असूनही १७ टक्के लोक व्यसनापासून दूर राहतात. व्यसने करणाऱ्यांच्या तऱ्हाही वेगवेगळ्या असतात. कोणी गुटखा, तंबाखू, कोणी सिगारेट तर काही जण ग्लासाला ग्लास भिडवून तणाव निवळण्याचा प्रयत्न करतात.टेंंशनमध्ये राहिल्याने तब्बल ४७ टक्के लोकांना महिन्यातून एक किंवा दोनवेळा दवाखान्याची पायरी चढावी लागते. तीनपेक्षा अधिकवेळा आजारी पडणाऱ्यांची टक्केवारी ९ इतकी असून ४४ टक्के लोक तणाव अंगावर काढण्याची क्षमता बाळगतात.तणावाला सामोरे जाण्यासाठी समुपदेशन, कामाचे नियोजन, आहार, व्यायामाबाबत मार्गदर्शन आदी बाबींची अपेक्षा उत्तरदात्यांनी व्यक्त केली.४या सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना बोलते केले तेंव्हा तणाव मुक्तीसाठी ना पालकांकडून प्रयत्न होतो ना शिक्षकांकडून.४त्यामुळे अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी अक्षरश: दबले आहेत.४८० टक्के शालेय विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ शाळा, शिकवणी यातच जातो. त्यांना ना व्यायामाला फुरसत असते ना मैदानावर जायला. ते सतत परीक्षा, अभ्यास व पालकांच्या अपेक्षा या ‘टेन्शन’मध्येच वावरत असतात.४महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही याहून वेगळी स्थिती नाही. तासिका, कॉलेज कट्टा, सांस्कृतिक कार्यक्रम यात रमणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८७ इतकी आहे. केवळ १३ टक्केच कॉलेजकुमार टेन्शन फ्री आहेत.४परिक्षेत आलेल्या अपयशामुळे निराश होऊन वर्षभरात जिल्ह्यामध्ये पाच विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे तणावमुक्त राहणे किती गरजेचे आहे हे लक्षात येते.४तणाव नियंत्रणासाठी शाळा, महाविद्यालयांकडून काही प्रयत्न होतात का यावर केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनी होकार दर्शविला.४व्यक्तिमत्व विकास शिबिरापलीकडे व मार्गदर्शनाशिवाय शिक्षकांकडून वेगळे पर्याय होत नाहीत हे समोर आले. हीच स्थिती पालकांच्या बाबतीतही आहे.