लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ट्रूजेट कंपनीने प्रवाशांसाठी अवघ्या ८०२ रुपयांपासून पुढे तिकीट दर उपलब्ध करून देण्याची आॅफर जाहीर केली; परंतु आॅनलाइन बुकिंग करताना त्याचा लाभ न मिळाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. या रकमेत विमान प्रवासाचा लाभ मिळाला नसल्याने ही घोषणा केवळ हवेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ट्रूजेट कंपनीने २६ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू केली. ७२ आसनी विमानाने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ८ ते १२ जुलैदरम्यान बुकिंग केल्यास ८०२ रुपयांपासून पुढे दर आकारण्यात येणार असल्याची योजना या कंपनीने जाहीर केली.या कालावधीत बुकिंग करणाऱ्यांना १५ जुलै ते १५ सप्टेंबरदरम्यान विमान प्रवास करता येईल. चार दिवसांपूर्वी ही योजना जाहीर झाली; परंतु प्रत्यक्षात आॅनलाइन बुकिंगदरम्यान ८०२ रुपयांत अथवा एक हजार रुपयांपर्यंत तिकीट मिळत नसल्याचे प्रवासी आणि टूर्स आॅपरेटर चालकांनी सांगितले.औरंगाबाद-हैदराबाद विमानाच्या जुलै महिन्यातील तिकिटांसाठी ३ हजार रुपयांवरील दर संकेतस्थळावर दर्शविण्यात आले. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांची निराशा झाली. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात औरंगाबाद-हैदराबादचे दर १६०० रुपयांपर्यंत दाखविण्यात आल्याचे सांगण्यात आले.अनेकांचेबुकिंगचिकलठाणा विमानतळावरील ट्रूजेट कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क साधला असता ही आॅफर सुरू असून, अनेकांची बुकिंग झाल्याचे त्यांनी सांगितले; परंतु ८०२ रुपयांत किती जणांची बुकिंग झाली, याविषयी माहिती देण्यास नकार दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही.
८०२ रुपयांची ‘आॅफर योजना’ हवेत
By admin | Updated: July 12, 2017 00:48 IST