औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा प्रभागांतील ३५ हजार ७३१ घरांची पाहणी केली. त्या घरांतील ७० हजार ७४५ जलसाठे तपासले. त्यापैकी ९७६ डेंग्यूसदृश डास अळ्या आढळून आल्या आहेत. तेथील पाणीसाठे रिकामे करण्यात आले असून, अॅबेट ट्रीटमेंट करण्यात आल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाने केला आहे. ४९८ कर्मचारी डेंग्यू नियंत्रणासाठी सुरू केल्या कोम्बिंग आॅपरेशनसाठी ४९८ कर्मचारी लावण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, आय.पी.पी.आय.मध्ये काम केलेले स्वयंसेवक यांचा या मोहिमेत सहभाग आहे.प्रभागनिहाय वसाहती व उपाय प्रभाग ‘अ’ मधील जयभीमनगर, जुना भावसिंगपुरा, लेबर कॉलनी, भोईवाडा, हर्षनगर, मंजूरपुरा, लोटाकारंजा, रोहिला गल्ली, प्रभाग ‘ब’ मधील एन-१, हर्सूल, अयोध्यानगर, प्रभाग ‘क’ मधील किराडपुरा, शरीफ कॉलनी, दत्तनगर, संजयनगर. प्रभाग ‘ड’ औरंगपुरा, खोकडपुरा, समतानगर, पदमपुरा, बन्सीलालनगर, सब्जीमंडी, भाग्यनगर, रमानगर, श्रेयनगर, प्रभाग ‘ई’ मधील पुष्पक गार्डन, म्हाडा कॉलनी, संघर्षनगर, चिनार गार्डन, मुकुंदवाडी, जे सेक्टर, संजयनगर, एन-३, एन-४, प्रभाग ‘फ’ मधील जुने हनुमान मंदिर, उल्कानगरी, सहयोगनगर, बनेवाडी, जनकपुरी या भागांमध्ये डासांची पैदास रोखण्यासाठी अॅबेट वाटप, धूरफवारणी, औषधी फवारणी करून उपाययोजना करण्यात आली आहे.
९७६ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या !
By admin | Updated: August 4, 2014 01:55 IST