बीड : जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून गायरान जमिनी संदर्भातील प्रकरणे प्रलंबित होते. यामध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी गायरानधारकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत १९९० पूर्वीपासून ताबा असलेल्या जिल्ह्यातील ८१ जणांना गायरान जमीनीचा हक्क दिला आहे.गायरान जमिनीवर हक्क मिळविण्यासाठी वर्षानुवर्ष सर्वसामान्य नागरिकांना संघर्ष करावा लागत होता. मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गायरान जमिनीच्या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष दिले असल्याचे पहावयास मिळत आहे. ज्याच्याकडे १९९० पूर्वीपासून संबंधित गायरान जमिनीवर ताबा आहे त्याबाबतचे सबळ पुरावे असलेल्यांना गायरानचा तात्काळ ताबा देण्यात येत आहे. गायरान प्रकरणांच्या सर्व फाईलची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत प्रकरणांची पडताळणी करण्यात येते. गायरान जमिनीचा लाभ मिळालेल्यांमध्ये परळी, गेवराई, केज या तालुक्यातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. महसूल प्रशासनाने गायरान जमिनीच्या अतिक्रमण धारकांच्या कामाला प्राधान्य दिले असल्याने लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
८१ जणांना गायरानचा ताबा
By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST