हिंगोली येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १३२, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील ४८, पडेगाव-औरंगाबाद येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३६८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील १६८ सदनिका व महानगरपालिका हद्दीतील २० टक्के सर्व समावेश योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील १४८ सदनिका अशा विविध उत्पन्न गटांतील एकूण ८६४ सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवाहन
औरंगाबाद : परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ३० जूनपर्यंत अर्ज भरून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुचाकीसाठी नवीन क्रमांक मालिका
औरंगाबाद : परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका एम एच २० एफव्हीहीमधील क्रमांकाचे वाटप संपत आले आहे. परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी एमएच २० एफडब्ल्यू १ ते ९९९९ ही मालिका ९ जून २०२१ पासून सुरू होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.