लातूर : लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून बुधवारी अखेरच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मनोहरराव गोमारे, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील कृउबासचे माजी सभापती दिलीप देशमुख, पं.स.चे माजी सभापती शिवाजी खांडेकर, राकाँचे सोमेश्वर कदम, उदगीरमधून माजी आ.टी.पी. कांबळे आणि शिवराज तोंडचिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील ५९ जणांनी माघार घेतली असून, आता ९० उमेदवार रिंगणात आहेत़ उदगीरमध्ये १३ जणांची माघार, १३ रिंगणात़़़उदगीर विधानसभा मतदारसंघात अतुल धावारे, शिवराज तोंडचिरकर, शिवाजी देवनाळे, इतिहास कांबळे, शिवाजी लकवाले, सरस्वती मिरगे, देविदास कांबळे, लक्ष्मण अदावळे, बालाजी सोनकांबळे, टी.पी. कांबळे, दगडू गाथाडे, सुशिलकुमार शिंदे आणि मंगळवारी धर्माजी सोनकवडे अशा एकूण १३ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात १३ जण आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बुधवारी सहा जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता बारा जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. कृउबासचे माजी सभापती दिलीप देशमुख, पं.स.चे माजी सभापती शिवाजी खांडेकर, रिपाइंचे दिगंबर गायकवाड, राकाँचे सोमेश्वर कदम, दस्तगीर शेख आणि प्रा.अकबर सय्यद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे विठ्ठल माकणे, भाजपाचे गणेश हाके, राकाँचे बाबासाहेब पाटील, शिवसेनेचे अशोक मुंडे, मनसेचे ओम पुणे, बसपाचे साजिद सय्यद, भारिपचे अॅड. माधवराव कौळगावे, अपक्ष विनायकराव पाटील, गुणवंत पाटील, सिद्राम गायकवाड, लायकोद्दीन काझी, रज्जब पठाण आदी रिंगणात आहेत.निलंगा विधानसभा मतदारसंघात चौघांनी माघार घेतली असून, महमद रफी शमशोद्दिन सय्यद, सुवर्णमाला पाटील, राजकुमार जीवणे, शिवाजी बिराजदार यांचा त्यात समावेश आहे़ तर अभय साळूंके, अशोक पाटील निलंगेकर, संभाजी पाटील निलंगेकर, बसवराज पाटील नागराळकर, डॉ़ शोभा बेंजरगे, अॅड़ सिद्धार्थ देशमुख, माधवराव पाटील, लिंबणप्पा रेशमे, संतोष ढाले, अन्वर सय्यद, राजेंद्र कासले, विवेक बिरादार, तुकाराम मुळे, शौकत अलीशेख, सत्यप्रकाश दिवे हे १५ रिंगणात आहेत़ निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळी पाच जणांत रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे यश कोणाच्या पदरी पडणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अखेरच्या दिवशी बारा जणांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे दत्तात्रय संपतराव बावणे, राष्ट्रीय संत संदेश पार्टीचे शिवाजी महादेव भिसे, अपक्ष दत्तू रामराव घोडके, निर्गुण शंकरराव साळुंके, संगीता शिवराज बनसोडे, तुकाराम धावारे, बालकिशन अडसूळ, अच्युत गाडे, व्यंकट रणखांब, संजय गोडसे, सुरेखा श्रीकिसन अडसूळ, अपूर्वकुमार शिवाजीराव कराड या बारा जणांनी माघार घेतली आहे. आता लातूर ग्रामीण मतदारसंघात १३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून कयुमखॉं पठाण, विनोद गुडे, मनोहर गोमारे, चंद्रकांत चिकटे, सय्यद रहिम जियाउल्ला, राजीव पाटील, बालकिशन आडसूळ, गजानन माने, बळवंत जाधव, अनंत दिवे पाटील, डॉ़ विजय अजनीकर, हमीदखाँ पठाण, ताहेर शेख, बाबासाहेब कांबळे, अजय सुरवसे, इस्माईल शेख, सुरेखा आडसूळ या १७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे़ आता २३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ औसा विधानसभा मतदारसंघात आता १४ जण रिंगणात असून ७ जणांनी माघार घेतली आहे़ माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये प्रवीण पाटील, दयानंद कदम, राम गायकवाड, हरिष डावरे, अमरदिप थोरात, मुक्तेश्वर देशमाने, शेख फहीम अ़रहिम यांचा समावेश आहे़
५९ जणांनी सोडले मैदान
By admin | Updated: October 2, 2014 00:37 IST