शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

५५ टक्के महिला अ‍ॅनिमियाने त्रस्त

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

माधवी वाकोडकर, औरंगाबाद औरंगाबाद शहरातील ५५ टक्के महिला अ‍ॅनिमियाने (रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) त्रस्त आहेत.

माधवी वाकोडकर, औरंगाबादऔरंगाबाद शहरातील ५५ टक्के महिला अ‍ॅनिमियाने (रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) त्रस्त आहेत. महिलांच्या तुलनेत ३० टक्के पुरुष अ‍ॅनिमियाने त्रस्त आहेत.सामाजिक आणि रोगप्रतिबंधक औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे येथे करण्यात आलेल्या सर्व्हेत ही आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याच वेळी त्यांची आरोग्यासंबंधीची माहिती फॉर्मद्वारे भरून घेण्यात आली. या माहितीत खाण्याच्या सवयी, नाश्ता घेता का? जंकफूडचे प्रमाण किती? शारीरिक तक्रारींचा समावेश होता. या माहितीवरून नागरिकांचे खाण्याकडे होणारे दुर्लक्ष उघड झाले. शहरातील ५५ टक्के महिलांना रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असण्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे म्हणजेच अ‍ॅनिमिया होणे. अ‍ॅनिमियाग्रस्त महिला व मुलींचे प्रमाण जास्त आहे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत मुलींची होणारी गैरसोय, तसेच जंकफूडकडे वाढत असलेला कल यामुळे हा आजार होतो.अ‍ॅनिमिया का होतो? मासिक पाळीतील रक्तस्राव, मूळव्याध, रक्तस्राव वाढणारे आजारआजार अंगावर काढणेआहारात लोह व प्रथिनांचे प्रमाण कमीसकस आहाराचे कमी प्रमाणलक्षणे - थकवा येणे, दम लागणे, चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे?नॉर्मल राहण्यासाठी स्त्रियांना १२.५, पुरुषांना १३ ग्रॅम, तर गरोदर मातांना ११ ग्रॅम हिमोग्लोबिनची आवश्यकता असते.स्त्री-पुरुष समानता असावीबऱ्याच कुटुंबांमध्ये पुरुषांचे जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न महिलांनी खाण्याची पद्धती रूढ आहे. कुटुंबातील स्त्री स्वत:च्या आरोग्याची उपेक्षा करून कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेते. हे टाळण्यासाठी प्रत्येक घरात स्त्री व पुरुष यांचा दर्जा समान असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन मुलींमध्ये लठ्ठपणा वाढेल या धास्तीमुळे नियमित खाण्याकडे होणारे दुर्लक्ष कमी व्हायला हवे. शरीर सुदृढ असेल तर ध्येय गाठणे शक्य होते. त्यामुळे लठ्ठपणा वाढू नये यासाठी सकस आहार न घेता जंकफूडला पसंती देणे चुकीचे आहे.- डॉ. जगन्नाथ दीक्षित, प्रमुख, सामाजिक व रोगप्रतिबंधक औषध वैद्यकशास्त्र विभाग, घाटी रुग्णालयआहार कोणता घ्यावा?शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ नये, तसेच ते नियंत्रणात ठेवता यावे यासाठी लोह तसेच प्रथिनेयुक्त आहाराची गरज असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य, डाळी, सुकामेवा, गूळ, फळे, टरबूज यांचा प्रामुख्याने समावेश असावा. शाकाहरी व्यक्तीला अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी दूध आणि लोहयुक्त पदार्थांशिवाय दुसरा पर्याय नाही. मांसाहारी व्यक्तीने मासे, मटन, चिकन, अंडी यांचा वापर नियमित करावा.