बीड: जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याने संपकरी डॉक्टरांनी तात्काळ सेवेवर हजर व्हावे, अन्यथा जीवनावश्यक सेवा अनुरक्षण कायद्यार्तंगत (मेस्मा) अर्तंगत कारवाई करण्यात येईल या आशयाच्या ५३ डॉक्टरांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी नोटिसा पाठविल्या आहेत. विविध माण्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी १ जुलैपासून संप पुकारला आहे. संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. उपचाराअभावी रुग्णांना परत जावे लागत आहे. उपचार न मिळाल्याने रुग्णांचा बळी जाऊ शकतो, म्हणून संपकरी डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. यामुळे सोमवारी डॉक्टर सेवेवर हजर होतील की नाही हे पहावयाचे आहे. (प्रतिनिधी)डॉक्टरांच्या संपाचा बीडमध्ये बळी ?गेवराई तालुक्यातील गंगथडी येथील युवकास गेवराई उप-जिल्हा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने बीड येथे उपचारासाठी वाहनातुन आणत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडली. गोविंद नवले असे त्या मृत झालेल्या युवकाचे नाव असून तो गेवराई तालुक्यातील गंगथडी येथील रहिवासी होता. सुत्रांनी दिलेल्या माहितनुसार, गोविंद यास गेल्या आठ दिवसापासून ताप येत होता. रविवारी रात्री त्याचा ताप वाढल्याने त्यास कुटूंबीयांनी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र तेथे डॉक्टर नसल्याने त्यास बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जात असताना गाडीतच त्याचा मृत्यू झाला. या संपदर्भात बोलताना जिल्हा रुग्णालयातील पोलिस आर.बी. प्रधान म्हणाले की, गोविंद नवले याला बीडकडे आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. गेवराईच्या डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी बीड येथे रेफर केले असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
५३ संपकरी डॉक्टरांना नोटिसा
By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST