शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

५०५ जण तापाने फणफणले !

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

कळंब : जिल्हाभरात साथीच्या आजाराने लहान बालकांसोबतच वृद्धही हैराण झाले आहेत. कन्हेरवाडी येथील चिकुन गुणियाची साथ आटोक्यात येते

कळंब : जिल्हाभरात साथीच्या आजाराने लहान बालकांसोबतच वृद्धही हैराण झाले आहेत. कन्हेरवाडी येथील चिकुन गुणियाची साथ आटोक्यात येते ना येते तोच शेळका धानोरा येथील एका मुलीचा डेंग्युसदृश्य आजाराने गुरूवारी बळी घेतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून बुधवारी दिवसभर सर्दी, खोकला आणि तापाचे तब्बल ५०५ रूग्ण दाखल झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली.कळंब तालुक्यात गत महिनाभरात एकही मोठा पाऊस झालेला नाही. शिवाय सततच्या ढगाळ हवामानामुळे पुरेसा सूर्यप्रकाशही राहिलेला नाही. त्यामुळे वातावरण कोंदट बनले असून डासांची उत्पत्तीही वाढली आहे. स्थानिक ग्रामपंचायतींकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच आता साथीच्या आराने डोके वर काढले आहे. कन्हेरवाडी येथे तीन-चार दिवसांपूर्वीच चिकुन गुनियाचा उद्रेक झाला होता. अनेक रूग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. असे असतानाच गुरूवारी शेळका धानोरा येथे डेंग्यूसदृश्य आजाराने पूजा किसण पांचाळ या पंधरा वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. मंगळवारी सदर मुलीला ताप आला होता. लागलीच उपचारासाठी तिला एका खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले. परंतु, बुधवारी तिच्या अजारात वाढ झाल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिचा मृत्यु झाला. दरम्यान, दिवसागणिक साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तालुुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी ५०५ बाह्य रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात १४१, ईटकूर १०४, येरमाळा १०८, दहिफळ ७१, मोहा ४५ तर मंगरूळ केंद्रात ३६ बाह्य रूग्णांची नोंद झाली आहे. (वार्ताहर)कन्हेरवाडी येथे सोमवारपासून चिकुन गुणियाची साथ गुरूवारी आटोक्यात आली आहे. ३३ रूग्णांव्यतिरिक्त अन्य एकही नवीन रूग्ण आढळून आला नसल्याने ही साथ आटोक्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. असे असले तरी आणखी तीन दिवस डॉक्टरांचे पथक गावामध्ये तैनात असणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.साथीच्या आजाराची लागण होवू नये, यासाठी डासांचे निर्मुलन करणे फार गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळवा, असे आवाहन डॉ. पुरूषोत्तम पाटील यांनी केले. तसेच जास्त पाणीसाठा करू नये, नाल्या व परिसराची साफसफाई करावी, असेही ते म्हणाले.