शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

४५० आॅटोरिक्षा परवाने रखडले

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

जालना : परिवहन विभागाने शैक्षणिक पात्रतेची अट घातल्याने जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकाचे चारशे परवाने मंजुरी अभावी पडून आहेत.

जालना : परिवहन विभागाने शैक्षणिक पात्रतेची अट घातल्याने जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकाचे चारशे परवाने मंजुरी अभावी पडून आहेत. परिवहन विभागाच्या उपपा्रदेशिक कार्यालयाने तातडीने हे परवाने द्यावेत अशी मागणी संयुक्त लोकतांत्रिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अब्दूल रफीक अब्दूल लतीफ यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.१९९७ पासून जिल्ह्यात नवीन आॅटोरिक्षांना परवाने परवाने देणे स्थगीत करण्यात आले. सोळा वर्षानंतर २०१३ - १४ जिल्हा व शहरासाठी १ हजार ३१४ आॅटोरिक्षा देण्याचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात आला. त्यास परिवहन विभागाने जाहीर प्रसिध्दी दिली. ज्यामध्ये वाहन चालविण्याचा बॅच असेल त्यांच्याकडून परवान्यासाठी अर्ज मागविले. त्यानंतर आॅटोरिक्षा परवान्यासाठी परिवहन विभागाच्या जालना उपप्रादेशिक कार्यालयाकडे ८५० अर्ज प्राप्त झाले. त्यात अनेक अर्ज आठवी पास परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्यांचे होते. परिवहन विभागाने केलेल्या आवाहनानुसारच सादर केले होते. छाननीनंतर ८५० पैकी ४४९ अर्ज मंजूर करण्यात येऊन ४०१ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले. प्रलंबित अर्जाची पुन्हा छाननी करून पनवान्याची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु ती प्रत्यक्षात कधी लागणार याची कोणीही माहिती देत नाही.पहिल्या यादीस तीन महिने उलटले तरी दुसरी यादी तयार करण्याबाबत कोणतीही हालचाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दिसत नाही. अनेक आॅटोरिक्षा चालक भाडयाची रिक्षा चालवतात. अनेकाकडे स्वत:च्या मालकीची रिक्षा व बॅच आहेत परंतु परवाना नाही. अनेक चालक आठवीपर्यंत शिक्षण घेऊ शकले नाहीत.त्यामुळे आठवीपर्यंत शिक्षणाच्या अटीमुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यांचे उपजीविकेचे साधन संपुष्टात येणार आहे.६० ते ७० टक्के आॅटोरिक्षा चालक आठवीपेक्षा कमी शिकले आहेत. त्यामुळे शिक्षणाची अट शिथिल करून प्रलंबित असलेल्या ४०१ अर्जाची पुनछांननी करून परवाने देण्याची मागणी अब्दुल रफीक यांनी केली आहे.या निवेदनावर रंजीत देशपांडे, नंदकिशोर रामरखय्या, प्रल्हाद घुमारे, शेख कलीम, शेख इब्राहीम, शेख अकील, अनवर खाँ, शेख गप्फार, शेख अजमत, शेख अकबर, शेख जुनेद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(प्रतिनिधी)अर्ज प्रलंबितच...८५० पैकी ४४९ अर्ज मंजूर करण्यात येऊन ४०१ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले. प्रलंबित अर्जाची पुन्हा छाननी करून पनवान्याची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु ती प्रत्यक्षात कधी लागणार याची कोणीही माहिती देत नाही.