फुलंब्री : संगणकीय ज्ञान प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या ४३ शिक्षकांकडून १५ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभागाने १९९९ अन्वये शिक्षक, कर्मचारी यांनी संगणक परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक होते. त्यानुसार २००७ सालापर्यंत सर्वांना संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असताना फुलंब्री तालुक्यातील सुमारे ४३ शिक्षकांनी हे प्रमाणपत्र सादर केले नाही, याचा खुलासा २०११ साली करण्यात आलेल्या लेखा परीक्षक अहवालात आढळून आला. त्यानुसार वरील ४३ शिक्षकांच्या वेतनवाढी बंद करणे गरजेचे होते; पण तेही करण्यात आले नाही, म्हणून शिक्षण विभागाने आदेश काढून संगणक प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ४३ शिक्षकांकडून १५ लाख रुपये वसूल करण्याचे सांगितले.फुलंब्री तालुक्यात संगणकीय प्रमाणपत्र सादर न करणारे शिक्षक ४३ पेक्षाही जास्त आहेत, त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. शासनाचे धोरण असताना सरकारी कर्मचारी किती दुर्लक्ष करतात हे या प्रकरणातून दिसून येते. संगणकाचे ज्ञानच नसल्याने ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार हा मोठा प्रश्न सर्वांना पडतो.
४३ शिक्षकांकडून १५ लाख वसूल करण्याचे आदेश
By admin | Updated: December 15, 2014 00:48 IST