औरंगाबाद : शहरात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळातर्फे रविवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात ४० दात्यांनी रक्तदान केले,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शंंतनू चौधरी यांनी दिली. रक्तदात्यासह कोरोनाच्या संकट काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मदत करणाऱ्या दात्यांना मंडळाचे मुंबई येथील अध्यक्ष विलास जोशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
रक्त संकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीने केले. यावेळी मंडळाकडून महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋग्वेदी मंडळाचे उपाध्यक्ष रवी जेहूरकर, सचिव नरेश जोशी व कार्यकारिणी सदस्य अंबादास कुलकर्णी, श्रीपाद मुगुटे, डॉ. अमोल पांडव, दत्तात्रय सुभेदार तसेच रामचंद्र अंधारकर,अनिरुद्ध नायगावकर, प्रवीण नंद, आनंद देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
[फोटोओळी - रक्तदान शिबिराप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ऋग्वेदी मंडळाचे सचिव नरेश जोशी, शंतनू चौधरी, प्रभाकर कुलकर्णी, विलास जोशी, प्रसाद ठकार, मिलिंद सरदेशमुख आदी.