शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

दीड वर्षात विवाहितांच्या छळाचे २३३ गुन्हे

By admin | Updated: July 11, 2014 00:59 IST

विजय मुंडे, उस्मानाबाद अरे संसार संसाऱ़ या बहिणाबार्इंच्या काव्यपंक्तींचा अर्थ जणू आजच्या पिढीला उमगला नसल्याचे पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणांवरून दिसून येते़.

विजय मुंडे, उस्मानाबादअरे संसार संसाऱ़ या बहिणाबार्इंच्या काव्यपंक्तींचा अर्थ जणू आजच्या पिढीला उमगला नसल्याचे पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणांवरून दिसून येते़ गत दीड वर्षात विवाहितांच्या छळाचे २३३ गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असून, यातील १५६ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत़ कलम ४९८ (अ) चा गैरवापर होत असल्याचे समोर आल्याने गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक न करता चौकशीअंती तथ्य आढळल्यानंतर अटक करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़ या निर्देशाबाबत ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेदरम्यान महिलांच्या छळामागे पैसा आणि समन्वयाचा अभाव हेच प्रमुख कारण ठरत असल्याचे समोर आले़ तर काही प्रकरणात महिलांचाही आततायीपणा नडल्याचे सांगण्यात आले़हुंड्यात राहिलेले पैसे, जमीन, गाडी घेण्यासह इतर कारणांसाठी लागणारे पैसे, चारित्र्यावरील संशय, काम येत नसणे, चांगली दिसत नाही, स्वयंपाक येत नाही, अशा अनेक कारणांवरून विवाहितांचा जाचहट सुरू आहे़ दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीत दरवर्षी वाढच होताना दिसत आहे़ दाखल प्रकरणात केवळ पती-पत्नीस नव्हे तर सासर-माहेरकडील अनेक मंडळींनाही त्रास सहन करावा लागतो़ मात्र, काही प्रकरणात या कलमाचा दुरूपयोग होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे़ केवळ पती कारणीभूत असला तरी सासू-सासरे, दीर, भावजयीसह परगावी राहणाऱ्या नदंण, तिच्या पतीसही या प्रकरणात गोवण्याचा प्रकारही समोर आला आहे़ ही मंडळी न्यायालयात निर्दोष सुटली तरी समाजात होणारी बदनामी आणि जेलची खावी लागणारी हवा यामुळे त्यांच्या मानसिकतेतही बदल होताना दिसून येतो़ काही प्रकरणात माहेरकडील मंडळी हस्तक्षेप करीत असल्याचेही दिसून आले आहे़ त्यांच्या सांगण्यामुळे गुन्हे दाखल झाल्याचेही दिसून येते़ अनेकवेळा महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर प्रथमत: महिला तक्रार निवारण कक्षातील अधिकारी, कर्मचारीही हे प्रकरण ठाण्यात जावू नये यासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करतात़ अनेकांच्या संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचे काम करत आहे़ तेथेही तडजोड झाली नाही तर ठाण्यात तक्रारी दाखल होतात़ (प्रतिनिधी)समेटासाठी प्रयत्नमहिला तक्रार निवारण कक्षाकडे दाम्पत्यामधील वादाचे प्रकरण आल्यानंतर आम्ही त्या दोघांमध्ये व कुटुंबात असलेला तणाव मिटविण्याचे काम करतो़ दोन्हीकडील मंडळींना बोलावून पुढील सामाजिक ताणतणाव व इतर बाबींवर समुपदेशन करून अधिकाधिक प्रकरणे कक्षातच मिटविण्यावर आम्ही भर देतो, असे महिला तक्रार निवारण कक्षातील सपोफौ माया दामोदरे यांनी सांगितले़समुपदेशनावर भरमहिला तक्रार निवारण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारीत आम्ही सासर-माहेरच्या मंडळींना बोलावून समुपदेशन करतो़ दोन्हीकडील बाजू समजावून घेत त्यांना समज देण्यात येते़ शिवाय पोलिस प्रकरण, न्यायालयातील प्रकरणानंतर समाजात येणाऱ्या अडचणी सांगून अधिकाधिक तंटे कक्षातच मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात़ ज्यांचे प्रकरण मिटत नाही ते पोलिस ठाण्यात तक्रारी देतात, असे कक्षप्रमुख पोनि माधव गुंडीले म्हणाले़पोलिसांना सूचना देण्याची गरजकाही प्रकरणात ४९८ (अ) चा गैरवापर होत असल्याचे दिसून येते़ मात्र, महिलांवर अन्याय, अत्याचार होतात ही बाब नाकारून चालणार नाही़ त्यामुळे तपासादरम्यान खरे आरोपी सुटू नयेत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे़ पोलिसांनी तपासात कुचराई केली तर पीडित महिलांना न्याय मिळण्याबाबत साशंकता आहे़ त्यामुळे न्यायालयाने पोलिसांनाही तपासादरम्यान खरे आरोपी सुटू नयेत, याबाबत सक्तीच्या सूचना देण्याची गरज अ‍ॅड़वैशाली धावणे-देशमुख यांनी व्यक्त केली़निर्णय स्वागतार्हकलम ४९८ (अ) मध्ये अनेकवेळा ज्यांचा संबंध नसतो, अशांचीही नावे आलेली दिसून आले आहे़ लग्न झालेली नणंद व तिच्या पती व इतर नातेवाईकांची नावे येतात़ प्रकरणांची चौकशी आणि न्यायालयात चाललेल्या खटल्यात समोर आलेल्या पुराव्यात त्या लोकांचा संबंध नसल्याचे दिसून येते़ त्यामुळेच असे प्रकार रोखण्यासाठी न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आऱएस़लोमटे म्हणाले़महिलांना न्याय मिळावासर्वोच्च न्यायालयाने समोर आलेल्या अनेक प्रकरणांवरून ४९८ (अ) बाबत निर्देश दिले आहेत़ आम्ही निर्भया हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो़ महिलांवर अगणित अत्याचार होतात़ काही प्रकरणात नसले तरी अनेक प्रकरणात तथ्य असते़ न्यायालयाचे निर्देश योग्य असले तरी महिलांना न्याय मिळणे गरजेचे असल्याचे निर्भयाच्या भूम हेल्पलाईन प्रमुख अ‍ॅड़अमृता गाढवे यांनी सांगितले़