शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

खरिपात १४२ कोटींची उलाढाल

By admin | Updated: May 22, 2016 00:35 IST

औरंगाबाद : मागील तीन वर्षांत कपाशीने अपेक्षित उत्पन्न न मिळवून दिल्याने शेतकऱ्यांचा कल यंदा मूग, तूर, मका बियाणे खरेदीकडे दिसून येत आहे.

औरंगाबाद : मागील तीन वर्षांत कपाशीने अपेक्षित उत्पन्न न मिळवून दिल्याने शेतकऱ्यांचा कल यंदा मूग, तूर, मका बियाणे खरेदीकडे दिसून येत आहे. परिणामी बीटी बियाणाच्या किमती ३० रुपयांनी उतरल्या आहेत, तर डाळींचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता कंपन्यांनी मूग, तूर बियाणांचे भाव दुप्पट करून टाकले आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात बी-बियाणे विक्रीत १४२ कोटींची उलाढाल होईल, असा होरा बियाणे विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने बळीराजासह सर्वांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे उत्साहात शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली असून, दुसरीकडे बी-बियाणे बाजारपेठेत कंपन्यांनी बियाणांचा मुबलक पुरवठा केला आहे. व्यापारी आता बळीराजाची प्रतीक्षा करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या क्षेत्रात कपाशीचे उत्पादन चांगले होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. मात्र, सततच्या दुष्काळामुळे कपाशीला त्याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कपाशीचे नगदी पीक असले तरी शेतकरी कपाशीपासून दोन हात दूर राहण्याच्या मन:स्थितीत सध्यातरी आहे. परिणामी, बीटी बनविणाऱ्या कंपन्यांनी बीटीच्या किमती ४५० ग्रॅम पाकीट मागे ३० रुपयांनी कमी केले आहे. सध्या ८०० रुपयास बीटी २ चे बियाणे विक्री होत आहे. एककाळ असा होता की, पोलीस संरक्षणात बीटी बियाणे विक्री होत, असे पण सध्या मुबलक प्रमाणात बीटी वाण उपलब्ध आहे. दुसरीकडे बाजारात डाळींचे भाव १०० ते १५० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे यंदा डाळींचे बियाणे खरेदी करावे, असा विचार शेतकरी करीत आहेत. मात्र, बियाणांच्या किमती कंपन्यांनी दुपटीने वाढविल्या आहेत. मूग ७००० ते ७५०० रुपये, तूर ८००० ते ८५०० रुपये व उडीद १०००० ते ११००० रुपये प्रतिक्विंटल बियाणे विकल्या जात आहे, तर दुसरे महत्त्वाचे पीक मकाचे बियाणे ७०० ते १ हजार रुपये बॅग विकली जात आहे, अशी माहिती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी दिली. जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात बीटी बियाणाचे १० ते १२ लाख पाकीट विक्री होतात. सुमारे ९० कोटींची उलाढाल यात होते. मका बियाणात २० ते २५ कोटी, तूर बियाणे १५ कोटी, बाजरी ५ कोटी, मूग ५ कोटी तर उडीद बियाणात २ कोटी, अशी एकूण १४२ कोटींची उलाढाल या हंगामात अपेक्षित आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडला तरच मूग बियाणाची विक्री वाढेल.