औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांवर आळा घालण्यात महानगरपालिका अयशस्वी ठरत आहे. परिणामी दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची पैदास वाढत असून, कुत्रे रोज सामान्यांचे लचके तोडत आहेत. पुंडलिकनगर, गजानननगर भागात मोकाट कुत्र्यांनी शुक्रवारी सकाळी ५ जणांचे लचके तोडले. तर शहरातील अन्य वेगवेगळ्या भागात ९ जणांना चावा घेतला. यापैकी १२ जणांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतले.