शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अमेरिकेच्या ‘टफ युनिव्हर्सिटी’कडून पाणी नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: August 27, 2016 00:29 IST

टफ युनिव्हर्सिटी युएस, युनिसेफ व निरी नागपूरची चमू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे.

चंद्रपूर : टफ युनिव्हर्सिटी युएस, युनिसेफ व निरी नागपूरची चमू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. ही चमू पाणी पुरवठा योजना नसलेल्या व पाणी पुरवठा योजना असलेल्या अशा चार तालुक्यांतील १० गावांमधील पाणी नमुने तपासणी करीत आहे. पाणी नमुन्यांमध्ये आढळलेले दोष दूर करण्यासाठी ही चमू शासनाला अहवाल सादर करणार आहे.टफ युनिर्व्हसीटी युएस व युनीसेफच्या गॅब्रेला स्टींग, निरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. खडसे, सहाय्यक म्हणून सतीश सावळे यांचा या चमूत समावेश आहे. ही चमू दहा दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील विविध गावांना भेटी देणार आहे. शासनस्तरावरुन चार तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहे व ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही, असे गावे निवड करण्यात आलेली आहेत. या दौऱ्यामध्ये ही चमू प्रत्येक गावात जाऊन प्रथम ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष-सचीव व सदस्य , जलसुरक्षक, आशावर्कर तसेच गावकरी यांच्यासोबत चर्चा करुन पाणी वापर कसे करतात, याबाबत विस्तृत माहिती जाणून घेत आहे. त्यानंतर ते गावांमध्ये काही महिलांसोबत चर्चा करून तेथील पाणी नमुने तपासणी केली जात आहे. घरात पाणी कुठ ठेवता, पाणी कसे वापरता, पाणी केव्हा भरुन ठेवता, पाणी गाळुन घेता का, पाणी स्वच्छ करण्याकरिता घरगुती काही उपाय करता का, जलसुरक्षक व आशावर्कर गावांमधील घरांमध्ये स्वच्छतेबाबत माहिती समजावून सांगतात का तसेच घरातील पाणी कुठे ठेवता, याची सुध्दा घरात जावून पाहणी केली जात आहे. घरातीलच पाणी नमुने जैवीक व रासायनिक तपासणीकरिता घेत आहे. ही चमू सदर अहवाल शासनाला सादर करणार आहे. या चमूसोबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पाणी गुणवत्ता तज्ञ्ज अंजली डाहुले, माहिती शिक्षण संवाद तज्ञ्ज प्रवीण खंडारे यांचाही सहभाग आहे. तीन सदस्यांचा समावेश : जिल्ह्यातील दहा गावांमधून घेणार पाणी नमुने या गावांना देणार भेटीवरोरा तालुक्यातील शेगाव, दादापूर, नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी, कोसंबळी गवळी, सोनुली, पारडी ठावरे, चंद्रपूर तालुक्यातील निंबाळा, वायगाव आणि जिवती तालुक्यातील चिखल बक, पाटण या गावांना टफ युनिर्व्हसीटी युएस, युनिसेफ व निरीची चमू भेट देणार आहे.पाणी वापराबाबत मार्गदर्शनदरम्यान हातपंप, विहीर व पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीचे नमुनेही चमू घेत आहे. लोकांना पाणी वापराबाबत जागरुकता निर्माण करणे, माहिती शिक्षण व संवाद घडवून आणने, हा या चमूचा मुख्य उद्देश आहे. आजही ग्रामस्थ पाणी वापराबाबत जागरुक नसल्यामुळे पाणी कशा कशामुळे दूषित होऊ शकते, याबाबतसुध्दा ही चमू मार्गदर्शन करीत आहे.