शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

जगाच्या पोशिंद्यावरच कर्जाचा डोंगर

By admin | Updated: October 10, 2015 00:13 IST

शेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही.

जगण्याची विवंचना : उत्पादनापेक्षा शेतीचा खर्च झाला महागप्रकाश काळे गोवरीशेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही. शेतीवर केलेला खर्च निघणार किंवा नाही याची कोणतीच हमी शेतकऱ्यांजवळ नाही. शेतीवर अतोनात खर्च करायचा. मात्र पदरात पडेल तेवढच घ्यायच. हाच वर्षानुवर्षापासूनचा नियम आजही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत असणे गरजेचे आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी सुखी-संपन्न असणे अपेक्षित आहे. मात्र शेतीला दिवसेंदिवस अवकळा येत असल्याने शेतकऱ्यांची स्थिती खालावत चालली आहे. विदर्भाची माती आणि त्या मातीत पिकणारे मोती शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणारे ठरतात. परंतु शासनाची शेतीविषयी उदासीनता व निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस कमी पडला. तरीही कमी पावसात शेतकऱ्यांनी कशीबशी शेती फुलविली. शेतमालाच्या फळधारणेवर पाऊस असणे गरजेचे असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र सप्टेंबर महिन्यात दोन दिवस आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. पावसाच्या जबरदस्त तडाख्याने कपाशी, मिरचीचे पीक पूर्णत: भुईसपाट केले.उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. पावसानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व मिरचीची पिके वाळली. हा पावसाचा परिणाम आहे की रोगाचा प्रादुर्भाव, हे मात्र कळायला मार्ग नाही. डवरनी, निंदन व रासायनिक खते, औषध देऊन पिके वाढविली. मात्र पावसाने पीक आडवे झाले. एवढ्या मोठ्या शेतातील भूईसपाट झालेले पीक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांचा अंत पाहण्यासारखे होते. मजुर परवडत नसल्याने कसेबसे शेतकऱ्यांनी स्वत:च कष्ट करून पीक उभे केले. मात्र पावसामुळे झाडाजवळील माती वाहुन गेल्याने झाडाला आधार उरला नाही.शेतकऱ्यांसारखे शेतातील पीक निराधार झाल्याने शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला नाही. यावर्षी सोयाबीन पिकाचा उतारा घटल्याने पिकांवर केलेला खर्च निघणार नाही, अशी विपरीत परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कुटुंबाची चिंता त्याला दिवस-रात्र सतावत आहे. काबाडकष्ट करूनही हाती काहीच शिल्लक राहत नसल्याने शेतीसह शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती झाली आहे.