शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

...तर चंद्रपुरात वाघांची संख्या वाढेल अन् संघर्षही संपेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात २०१४ मध्ये १११ वाघ होते. २०२१ अखेरपर्यंत वाघांची संख्या ३०० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. चिंतेची बाब ...

चंद्रपूर : जिल्ह्यात २०१४ मध्ये १११ वाघ होते. २०२१ अखेरपर्यंत वाघांची संख्या ३०० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. चिंतेची बाब म्हणजे वाघ-मानव संघर्षही वाढत आहे. या संघर्षात आतापर्यंत २६ वाघ आणि १२२ व्यक्तींचा मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. त्यासाठी वाघ, वन्यजीव व मानवातील सहअस्तित्वावर आधारित दीर्घकालीन उपायांची गरज आहे. तरच वाघांची संख्या वाढेल आणि संघर्षही संपेल, असा आशावाद वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.

हमखास व्याघ्र दर्शन घडविणारा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. उत्तम अधिवास, वन्यजीव क्षेत्रातील संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढू लागली. चंद्रपूर शहराजवळच तब्बल २१ वाघ आहेत. चंद्रपूर प्रादेशिक जंगलात ३० पिलांच्या वाघिणी, ३७ बछडे आणि ४१ लहान व वयस्क वाघ आहेत, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, चुकीच्या विकास संकल्पना व रोजगाराच्या अभावामुळे नागरिकांची जंगलावरील अवलंबिता वाढली. सुमारे ८०० गावे जंगलात किंवा जंगलालगत आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला. २०१४ ते २०२१ या वर्षांत नैसर्गिक, अपघात व शिकार अशा घटनांत ६४ वाघांचा मृत्यू झाला. नैसर्गिक कारणामुळे ३८, अपघातात ११ व शिकारीत १५ वाघांचा मृत्यू झाला. २०१९-२०२० या दोन वर्षांत शिकारीमुळे १० वाघांचा मृत्यू झाला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै २०२१ रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी आणि तज्ज्ञांची वेबिनार बैठक घेऊन सूचना व उपाययोजना मागविल्या आहेत.

बॉक्स

अशा आहेत उपाययोजना...

वन जमीन व वाघांच्या भ्रमणमार्गात वनीकरण, गवताळ प्रदेश वाढवावा, जलसाठे तयार करावेत, गावाजवळ मोह, फळझाडे, तेंदू झाडांची लागवड करावी, शेतीसाठी सोलर कुंपण, गावांची जंगलावरील अवलंबिता कमी करावी, जंगलातील रस्त्यांना वन्यजीवांना आतून मार्ग द्यावा, वनशेतीला चालना, वाघ-मानव संघर्षासाठी स्वतंत्र सेल स्थापन करावा, जंगलात चराईवर नियंत्रण आणावे, वन विभागाने नियमित निरीक्षण करावे, शासनाने लोकांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध विकास योजना राबवाव्या, आदी उपाययोजना चंद्रपुरातील तज्ज्ञांनी सुचविल्या आहेत.

कोट

वाघ, वन्यजीव व मानवाच्या सहअस्तित्वाची गरज आहे. मात्र, वाघ, वन्यजीव-मानव संघर्ष वाढला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५५ टक्के घटना ब्रम्हपुरी, २५ टक्के चंद्रपूर व २० टक्के घटना मध्य चांदा विभागात घडल्या आहेत. दोघांचेही प्राण वाचवायचे असतील, तर वन विभाग, नागरिक, स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दीर्घकालीन उपायांवर भर द्यावा, याकडे नागपुरातील बैठकीत लक्ष वेधले.

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर