चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर आगार आहे. या अंतर्गत विभागात बसेस चालविल्या जाते. मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी एस.टी.ला कोट्यवधीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असल्याने एस.टी. महामंडळाची सेवा दुसऱ्या ालाॅकडाऊननंतर पूर्वपदावर येत आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक गाडीची लाईव्ह वेळ कळावी यासाठी एस. टी. महामंडळाने व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम आणली आहे. त्यामुळे एस.टी. नेमकी कुठे आहे. बसस्थानकावर पोहोण्यासाठी किती वेळ लागेल हे सर्व प्रवाशांना दिसणार आहे.
बाॅक्स
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
नियोजित थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहिती महामंडळाला कळणार आहे. त्यामुळे संबंधित चालक किंवा वाहकावर कारवाई करणे शक्य होणार आहे.
बस कुठल्या मार्गावर आहे. तिथून बसस्थानकात यायला किती वेळ लागेल. उशीर झाला तर याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. चालक वेळकाढूपणा करत असेल तर कारवाई करता येणार आहे. या सिस्टीममुळे प्रत्येक एस.टी.ला बसस्थानकात थांबावेच लागणार आहे.
बाॅक्स
बसस्थानकात लागणार मोठे स्क्रीन
बसस्थानकात डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार आहे.
डिप्ल्से माध्यमातून कुठली बस कुठल्या बसस्थानकात येणार आहे, याची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.
बस सुटण्याची व पोहोचण्याची वेळ निश्चित असेल. ती वेळ प्रवाशांना डिस्प्लेच्या माध्यमातून समजणार आहे.
बाॅक्स
बसची स्पीड तसेच लोकेशन या प्रणालीद्वारे कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत बसण्याची आता गरज पडणार नाही.
एस.टी.चे वेळापत्रक सुधारावे, बसची सद्य:स्थिती प्रवाशांना कळावी यासाठी व्हीटीएस. प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोट
एस.टी.ची वाट बघत असलेल्या प्रवाशांना एस.टी. कुठे आहे याची माहिती कळावी यासाठी ही यंत्रणा आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकात याबाबत डिस्प्ले बोर्ड बसविण्यात येणार असून तांत्रिक बाबीची पूर्तता सुरू आहे.
-संजय सुर्वे
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर