शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

मनरेगावर १० कोटी खर्च

By admin | Updated: February 3, 2016 00:51 IST

‘मागेल त्या हाताला काम द्या’ असे शासनाचे ब्रिद आहे. रोहयोच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात असली तरी अनेकांना बेरोजगारच रहावे लागत होते.

जिल्ह्यात चिमूरची आघाडी : वर्षभरात ३ लाख ५३ हजार मनुष्य दिवसांची निर्मितीराजकुमार चुनारकर खडसंगी‘मागेल त्या हाताला काम द्या’ असे शासनाचे ब्रिद आहे. रोहयोच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात असली तरी अनेकांना बेरोजगारच रहावे लागत होते. आता शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ६० टक्के मजूर व ४० टक्के मशनरी असे गुणोत्तर ठरविले असल्याने अनेकांच्या हाताला कामे मिळाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असली तरी चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये नऊ कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च झाला असून बऱ्यापैकी हाताला रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यात या कामात चिमूर तालुक्याने आघाडी घेतली आहे.देशातील बेरोजगारीवर ठोस उतारा म्हणून तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. मात्र यातील गुणोत्तरात ग्रामसेवकासह अभियंता प्रवर्गातील अधिकाऱ्यांनीही कुशल - अकुशलमध्ये फेरफार दाखविल्याचे चित्र दिसून आले आहे. ६०-४० च्या गुणोत्तरांमध्ये अनेक योजनांमधील तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकारावर अंकूश बसलेला आहे.यात दुर्दैव असे की वाढत्या महागईतही रोजगार हमी योजनेच्या मजुरांना फक्त १६८ रुपये मजुरी देण्याचीच परंपरा केंद्र सरकारने कायम राखलेली आहे. मागील वर्षी काही भागात दुष्काळ असला तरी या योजनेचा कोणी प्रखरतेने वाली नसल्याचेही काही ग्रामपंचायतीमध्ये जाणवत आहे.यावर्षीपासून अकुशलपोटी मजुरावर जास्त खर्च करण्याची मर्यादा पाळल्याने काही गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कृपेने चांगली मजुरी मिळालेली आहे. मागील वर्षात अकुशलवर ६ कोटी ४५ लाख तर कुशल बाबीवर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती रोजगार हमी योजना कार्यालयातून देण्यात आली. चिमूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षात मनरेगावर ९ कोटी ९५ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये तीन लाख ५३ हजार मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे दहा हजार मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन सांगण्यात येत आहे. ९ कोटी ९५ लाखांच्या कामात अकुशल कामावर ६ कोटी ४५ लाख तर कुशलवर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च करीत हजारो मजुरांना रोजगार मिळाला असून यामध्ये अनेक गावात पांदन रस्ते, शेततळे, विहिरी ही कामे झाली आहेत.गुणोत्तर प्रमाण ठेवूनच यंदा झाला खर्चमागील वर्षाअगोदर सरसकट खर्च करण्याच्या नादात व ग्रामसेवक, अभियंता वर्गातील अधिकाऱ्यांमुळे रोजगार हमी योजनेचे गुणोत्तर बिघडले होते. त्याचाच फटका हजारो इच्छुक लाभार्थ्यांना बसला होता. मात्र मागील वर्षी प्रशासकीय खर्चापोटी ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी खर्चुन हे गुणोत्तर पाळण्याचे मोठे आव्हान प्रशासनाने पूर्ण केले आहे. यदा ६०:४० (अकुशल, कुशल) या गुणोत्तराने हे कामे करण्यात आली आहेत.सन २०१५-१६ मध्ये १० कोटी रुपयांचा निधी मनरेगा अंतर्गत खर्च करण्यात आला. त्यामध्ये अंदाजे दहा हजार मजुरांना रोजगार देण्यात आला. जूनअखेरपर्यंत या वर्षात १५ कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत मनरेगामधून शेततळे, सिंचन विहीर, तलाव खोलीकरण यासारखी कामे करण्यात येणार आहेत.- मिलिंद कुरसंगे, विस्तार अधिकारी (मनरेगा) पं.स. चिमूर