शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:25 IST

चंद्रपूर : शहरातील सिव्हील लाईन तसेच रामनगर चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथील डाॅ. ...

चंद्रपूर : शहरातील सिव्हील लाईन तसेच रामनगर चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरातील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र वीज खांब काढण्यात न आल्यामुळे अनेकवेळा अपघात होत आहे. त्यामुळे वीज खांब हटविण्याची मागणी केली जात आहे.

सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्या

चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरपना येथे दर शुक्रवारी तर गडचांदूर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी आणतात.

आधार कार्डसाठी केंद्रावर गर्दी वाढली

चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावांतील नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र शोधताना सध्या नागरिक दिसत आहे. त्यामुळे गावागावात आधार कॉर्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील तेलवासा ते सुमठाना हा रस्ता आयुध निर्माणी चांदाच्या अखत्यारित येतो. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी नागरिकांनी अनेकवेळा निवेदन दिले आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण

वरोरा : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वार्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला. त्यामुळे नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वन्यप्राण्यांचा बंदबोस्त करण्याची मागणी

जिवती : जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या हंगामाचे दिवस असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना तारेचे कुंपन तसेच अन्य योजना सुरु कराव्या, अशी मागणी केली जात आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. दुचाकी वाहने स्लिप होऊन अनेकांचे अपघातही झाले आहे.

कचरा तुंबल्याने आरोग्य धोक्यात

चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवर येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून वार्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.

बीपीएल यादीचे सर्वेक्षण करावे

चंद्रपूर : गोरगरिबांना धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बीपीएल धारकांची यादी करण्यात आली आहे. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी सधन कुटुबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक योजना कागदोपत्रीच असल्याने गरजू नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे.