शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:59 IST

सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे.

ठळक मुद्देआठ वर्षातील आकडेवारी : विविध कारणांनी २२ वाघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. मागील आठ वर्षांचा अभ्यास केला तर चंद्रपूर, मध्यचांदा वनविभागाच्या तुलनेत ब्रह्मपुरी वनविभागात हा संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसते. या क्षेत्रात आठ वर्षात सुमारे ३० जणांचा बळी गेला आहे. एवढेच नाही तर २२ वाघ आणि २७ बिबट्यांचाही या क्षेत्रात मृत्यू झाला आहे.चंद्रपूर हा जिल्हा खनिज संपत्तीने नटलेला आहे. कोळसा, सिमेंट खाणी, आयुधनिर्माणी कारखाना व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र या जिल्ह्यात असल्याने चंद्रपूर जिल्हा देशात सुपरिचित आहे. असे असले तरी अलिकडच्या काळात चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जातो. त्याचे कारणही तसेच आहे. अलिकडच्या काळात जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यासोबतच बिबट्यांचीही संख्या वाढली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजनानासाठी पोषक असल्याने हे शक्य होत आहे. असे असले तरी जंगल मात्र तेवढेच; किंबहुना त्यापेक्षा कमी होत असल्याने वाघासाठी जंगलातील अधिवास कमी होत आहे. प्रत्येक वाघाचे एक वेगळे क्षेत्र असते. या क्षेत्रात दुसºया वाघाचा वावर तो खपवून घेत नाही. या प्रकारामुळे वाघाचा मागील काही वर्षात मानवी वस्तीकडे वावर वाढू लागला आहे. गावशिवारात वाघाचे दर्शन होत आहे. पाळीव प्राणी आणि वन्यप्राण्यांवरही हल्ले होत आहे. चंद्रपूर वनविभाग, मध्यचांदा वनविभाग व ब्रह्मपुरी वनविभागात मोठ्या प्रमाणावर वाघ, बिबट्यांचे मानवांवर हल्ले झाले आहेत. यातील ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक व्याघ्र हल्ले घडून आले आहेत. या क्षेत्रात मागील आठ वर्षात ३० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याशिवाय शेकडो पाळीव प्राण्यांनाही वाघ व बिबट्याने ठार केले आहेत. विशेष म्हणजे, एकट्या ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये एक, २०११ मध्ये तीन, २०१२ मध्ये एक, २०१३ मध्ये एक, २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये चार, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये सहा वाघांचा मृत्यू झाला आहे.२७ बिबट्यांचाही मृत्यूब्रह्मपुरी वनविभागात वाघांसोबत बिबट्यांचीही संख्या अलिकडे वाढली आहे. मात्र जंगल परिसर कमी होत असल्याने व गावशिवारात झुडुपी जंगल वाढत असल्याने बिबट्याचाही मानवी हद्दीत वावर वाढला आहे. ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये दोन, २०११ मध्ये चार, २०१२ मध्ये चार, २०१३ मध्ये एक, २०१४ मध्ये दोन, २०१५ मध्ये एक, २०१६ मध्ये पाच, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.