शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

By admin | Updated: March 8, 2017 00:40 IST

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला.

शेतपिकांचे अतोनात नुकसान : वादळामुळे झाडे कोसळली, अनेक गावांतील बत्ती गूलचंद्रपूर : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. कोठारी, बल्लारपूर, राजुरा येथे गारांच खच पाहायला मिळाले. राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यात अर्धा ते एक तास झालेल्या वादळी पावसाने हरभरा, तूर, लाखोरी, मिरची, मुंग आदी रबी शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून वीज तारांवर झाडे कोसळल्याने अनेक गावांतील बत्ती गूल झाली. बल्लारपूरला दोनदा झोडपलेमंगळवारला दुपारी ३ वाजता वादळी पावसाने गारांसह हजेरी लावल्याने बल्लारपूरकरांची चांगलेच तारांबळ उडाली. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि विद्युत तारा तुटल्या. पहिल्या वादळी व गारपीटीच्या तीव्र पावसानंतर परत एक तासाने गारांसह पाऊस बरसला. येथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण, दुपारी ११ वाजता प्रखर उन्ह असताना अडीच-तीन वाजताचय सुमारास वातावरणात बदल होऊन ३ वाजता तुरळक पाऊस सुरू झाला. बघता बघता वादळ सुटले आणि पाऊस झाला व गाराही पडल्या. हा वादळी पाऊस व गारांचा मारा बंद झाल्याच्या एक तासानंतर परत ढगांनी गडगडाट सुरु केला व पाऊस सुरु झाला. सोबत गाराही पडू लागल्या. पण, यावेळेला तीव्रता कमी होती. या वादळी पावसामुळे वीज खंडीत झाली. उशीरापर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होता. पावसामुळे तालुक्यात मिरची तसेच कापस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (तालुका प्रतिनिधी) घुग्घुस परिसरात पाऊसघुग्घुस : मंगळवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. शहरात विजेचा लंपडाव सुरू असून मंगळवारी साडेअकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद होता.कोठारी परिसरात गारांचा पाऊसकोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरात मंगळवारी दुपारी ३.३० वाजतापासून ५ वाजेपर्यंत गारांसह वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. ३.३० वाजता वादळासह ५ वाजेपर्यंत गाराचा पाऊस सुरु होता. वादळाने अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले. कोठारी परिसरात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, मुंग, उदड,, मिरची पिकासह अनेक पिकांची लागवड झाली असून काहीनी कापनी सुरु केली तर काही कापणीवर येवून आहेत. अशात अवकाळी पाऊस गारासह बरसल्याने शेतपिकाची प्रचंड नासाडी झाली आहे. या नुकसानीची चौकशी करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार यांनी केली आहे. (वार्ताहर)